Ajit Pawar भाजपासोबत जाणार? राष्ट्रवादीतील ‘त्या’ आमदारांची भूमिका काय?

मुंबई तक

Ncp’s Ajit Pawar Joining Hands With Bjp :राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपासोबत जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा राजकीत वर्तुळात सूरू झाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना राष्ट्रवादीच्याच 30 ते 40 आमदारांनी पाठींबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यात मोठा राजकीय़ भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

ajit pawar join bjp sources what ncp mlas says
ajit pawar join bjp sources what ncp mlas says
social share
google news

Ncp’s Ajit Pawar Joining Hands With Bjp : राज्यात शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना राष्ट्रवादीच्याच 30 ते 40 आमदारांनी पाठींबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यात मोठा राजकीय़ भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान अजित पवार यांना 2019 च्या पहाटेच्या शपथविधीदरम्यान अनेक आमदारांनी (MLAs Support) पाठिंबा दर्शवला होता. या आमदारांची यावर काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेऊयात. (ajit pawar join bjp sources what ncp mlas says read full story)

अजित पवार (Ajit Pawar) गेल्या काही दिवसांपासून ‘नॉटरिचेबल’ आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यासोबत असलेल्या पुण्यातील रॅलीचा कार्यक्रम रद्द केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. या बातम्यानंतर अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्यांना बळ मिळाल होते.मात्र या बातम्यांवर नंतर त्यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले होते.

हे ही वाचा : NCP फुटणार?: शरद पवारांनी अजित पवारांचा विषयच संपवला, म्हणाले…

अजित पवार ट्विटमध्ये काय म्हणाले?

खारघर येथे झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे अपघाती मृत्युमुखी पडलेल्या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि बाधितांची भेट घेण्यासाठी मी सोमवारी सकाळपर्यंत एमजीएम रुग्णालयात उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असे अजित पवार यांनी ट्विटकरून स्पष्ट केले होते.तसेच मी मुंबईत आहे. उद्या, 18 एप्रिल मंगळवारी मी विधानभवन येथील माझ्या कार्यालयात उपस्थित राहिन आणि कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहिल, असेही ते म्हणालेत. तसेच मी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले होते असे पवार यांनी नमूद करत, मी आमदार, पदाधिकाऱ्यांची कोणतीही बैठक बोलावली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

तुम्ही सर्व चॅनेलवाले एक युनिट अजितदादांच्या मागे लावा. एक कार्यक्रम रद्द केल्यानंतर असे काही होत नाही,अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली होती. अजित दादांच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही गोष्ट दादांना विचारा, माझ्याकडे गॉसिपसाठी वेळ नाही आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खुप कामे आहेत. त्यामुळे मला या गोष्टीची माहिती नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp