NCP : अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सुनावणीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

जयंत पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण

point

सर्वोच्च न्यायालयात काय झाले?

point

शिवसेना-राष्ट्रवादीच्या प्रकरणाबद्दल महत्त्वाचा निर्णय

NCP Supreme Court hearing : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या याचिकांवर एकत्रच सुनावणी घेण्याचा निर्णय दिला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह प्रकरणाशी संबंधित इतरांना नोटीस बजावली आहे. (Supreme Court issues notice to Ajit Pawar and others)

ADVERTISEMENT

अजित पवारांसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्रत ठरवले नाही. त्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणी वेळी अभिषेक मनू सिंघवी यांनी जयंत पाटलांच्या वतीने बाजू मांडली.

सुप्रीम कोर्टातील संपूर्ण युक्तिवाद बघा

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रकरणावर एकत्रच सुनावणी घेण्यात येईल. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह इतर पक्षकार पक्षांनाही नोटीस बजावली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> केतकी चितळेचा यशश्रीच्या हत्येनंतर व्हिडीओ, पोलिसांवर गंभीर आरोप

आमदार अपात्रता प्रकरणावर एकत्रच सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणांवर सुप्रीम कोर्ट एकापाठोपाठ सुनावणी घेणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांनी दोन्ही पक्षाच्या दोन्ही चारही गटातील आमदारांना पात्र ठरवले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT