“आता देवेंद्र फडणवीसांचा गळा धरू का?”, अजित पवारांचं उत्तर ऐकून…
अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काळजी घेत असल्याच्या, सॉफ्ट असल्याच्या चर्चांना प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT
पुणे : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विरोध करायचा म्हणजे आम्ही एकमेकांचे गळे धारावेत असं तुम्हाला वाटतं का? आम्ही एकमेकांच्या अंगावर धावून जावं असं वाटतं का? असा प्रश्न करत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काळजी घेत असल्याच्या, सॉफ्ट असल्याच्या चर्चांना प्रत्युत्तर दिलं. ते पुण्यात सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (NCP Leader Ajit Pawar talk on relation with DCM Devendra Fadnavis)
ADVERTISEMENT
मागील काही दिवसांपासून अजित पवार यांची भाजपशी आणि त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढतं असून ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाणं आलं आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असल्याच्याही चर्चा मध्यंतरीच्या काळात अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर सुरु झाल्या होत्या. याशिवाय अजित पवार माझ्याबाबतीत खूपच डिफेंन्सिव्ह असतात, असं विधान ‘मुंबई तक’च्या बैठकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केल्यापासून या सगळ्या चर्चांना अधिक हवा मिळाली. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं.
काय म्हणाले अजित पवार?
कायम अशी एक चर्चा राहिली की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सॉफ्ट राहिलात. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत असे म्हटले की दादा माझ्या बाबतीत डिफेन्सिव्ह असतात. तुम्ही खरंच सॉफ्ट आहात का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला.
हे वाचलं का?
“मुख्यमंत्रीपदावर आताच दावा करू शकतो”, बंडाच्या चर्चानंतर अजित पवारांचं मोठं विधान
या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, तुम्ही सतत बघता आम्ही सभागृहामध्ये ज्यांच्या चुका होतील त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या प्रकारे तिथं भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने राजकीय जीवनामध्ये तुमचे कुणाचे कसे संबंध आहेत, आदरणीय पवार साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. दोघे अनेकदा एकमेकांना भेटायचे, एकमेकांकडे जेवायला जायचे. म्हणजे हे आपण आम्ही स्वतः बघितलेले आहे. पण ज्यावेळेस ते सभा घ्यायची त्यावेळेस ते दोघे एकमेकांवर तुटून पडायचे. पवार साहेबांना त्यांनी काय उपमा दिलेली आपण ऐकलेले आहे, पवार साहेबांनी त्यांना छातीच्या बाबतीत काय उपमा दिलेली आहे ते तुम्ही पण ऐकले आहे. हे चालत असतं.
एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे. राजकीय मतमतांतर काही असली, विचारधारा वेगवेगळी असली तरी आम्ही काय एकमेकांचे दुश्मन नाही. आम्ही काय एकमेकांचा बांध रेटलेला नाही. आम्ही एकमेकांचे गळे धारावेत असं काही तुम्हाला वाटतं का? आम्ही तिथं काही एकमेकांच्या अंगावर धावून जावं असं वाटतं का? किंवा काही भागात खुर्च्या फेकाफेकी होती, मारामारी होती असं व्हावं वाटतं का? तसं झाल्यानंतरच खरचं हे दोघे एकमेकांचे विरोधक आहे असं म्हणणार का?
ADVERTISEMENT
तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांपासून बघा, चव्हाण साहेब यांच्यावर प्रल्हाद केशव अत्रे किती टीका करायचे, चव्हाण मधला च काढल्यानंतर काय राहतं आणि बरंच काही म्हणायचे. पण एकत्र जमल्यानंतर ते एक महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणून एकमेकांशी आदरानेच बोलायचे. तशा पद्धतीने आपण राहिले पाहिजे. आता कोणी जाणीवपूर्वकच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं साटं-लोटं आहे, असं जर सारखचं कोणी सांगायला लागलं तर आमचा नाईलाज आहे. आमचं एक आहे त्यांचा जन्म 22 जुलैचा आणि माझाही 22 जुलैचा, पण साल वेगवेगळे आता त्याला दोष आमचा आहे का? त्यामुळे तसं काही आपण मनात आणू नका.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी 15 वर्ष सत्तेत असून दुसरी बारामती का तयार झाली नाही? अजित पवार म्हणाले…
काही आपल्या योग्य सूचना असतील तर त्याचाही आम्ही आत्मचितंन, आत्मपरीक्षण करू आणि पुढे आमच्यात सुधारणा करू. आम्ही काय आईच्या पोटातून सर्व गुणसंपन्न होऊन जन्माला नाही आलो. काही कुठे चुकतं असेल काही कुठे राहत असेल तर त्याची नोंद घेऊ. एक आमचं मन सांगतं की आम्ही अतिशय आक्रमकपणे तिथे भूमिका मांडतो पण असं सातत्याने बोललं जातं, तुमच्यासारखे पण प्रश्न विचारतात. परवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी पण मला असाच प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मी त्याबद्दलची काळजी घेईन, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT