Baramati News : लाडक्या बहिणी साड्या न घेताच निघून गेल्या! युगेंद्र पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ, काय घडलं?
Yugendra Pawar Latest News Update, Baramati : लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी बारामतीत महिलांना मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी युगेंद्र पवार यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
युगेंद्र पवारांच्या बारामतीच्या कार्यक्रमात गोंधळ का उडाला?
महिलांनी साड्या न मिळाल्याने व्यक्त केली नाराजी
लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन
Yugendra Pawar Latest News Update, Baramati : लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी बारामतीत महिलांना मोफत साडी वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी युगेंद्र पवार यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता. परंतु, काही महिलांना साड्या न मिळाल्याने या कार्यक्रमात गोंधळ उडाला. आठ तास थांबल्यानंतरही साडी न मिळाल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली. गोंधळाची स्थिती झाल्यानंतर स्वतः युगेंद्र पवार यांनी रात्री उशिरा महिलांना साड्या वाटप केले. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त महिला साडी न घेताच निघून गेल्या.
बारामती तालुक्यातल्या माळेगाव मध्ये युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन आणि श्रावणसखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचे विविध खेळ घेण्यात आले आणि त्यानंतर जवळपास दीड हजार महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार होते. मात्र, साडी वाटपाचे नियोजन चुकले आणि प्रत्यक्ष साडीवाटपाच्या वेळी प्रचंड गोंधळ सुरू झाला.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, पैशांचं टेन्शनच घेऊ नका! सरकारने दिली आणखी एक संधी
ज्या महिला सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होत्या, त्या महिलांना साडी तर मिळालीच नाही, पण आठ तास उपस्थित राहून देखील साडी न मिळाल्याने त्यांचा मनस्ताप झाला. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केलीय. महिलांची वाढती नाराजी लक्षात घेऊन योगेंद्र पवार यांनी स्वतः उशिरा कार्यक्रमास्थळी भेट देत उपस्थित असलेल्या महिलांना स्वतः साडीवाटप केले. मात्र, सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बहुतांश महिला साडी न घेताच घरी निघून गेल्या. त्यामुळे युगेंद्र पवार यांच्या प्रमोशनसाठी घेतलेला कार्यक्रम सपशेल फेल गेल्याची चर्चा सुरू आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Daily Horoscope : आज 'या' राशीच्या लोकांना लॉटरीच लागणार! समस्याही होतील दूर, पण...
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींकडून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. युगेंद्र पवार यांनीही बारामतीत महिलांना मोफत साडी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा होत असतनाच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं समजते. परंतु, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या काही महिलांना साड्या न मिळाल्याने एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT