Nitin Gadkari: ‘गडकरींसोबत मी नक्कीच उभा राहीन’, रोहित पवारांच्या ‘त्या’ आरोपांमुळे मोठी खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp mla rohit pawar has made a serious allegation that the bjp is deliberately trying to put nitin gadkari in trouble news on maharashtra politics
ncp mla rohit pawar has made a serious allegation that the bjp is deliberately trying to put nitin gadkari in trouble news on maharashtra politics
social share
google news

Rohit Pawar on Nitin Gadkari: मुंबई: ‘येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते.’ असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित (Rohit Pawar) पवार यांनी केला आहे. त्यामुळे पु्न्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (ncp mla rohit pawar has made a serious allegation that the bjp is deliberately trying to put nitin gadkari in trouble news on maharashtra politics)

ADVERTISEMENT

भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मंत्रालयासंबंधी कॅगने आपल्या अहवालात काही गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. ज्यामुळे गडकरी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र, हा सगळा प्रकार नितीन गडकरींना अडचणीत आणण्यासाठीच असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. हे भाजपचंच अंतर्गत राजकारण असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी या सगळ्याबाबत एक ट्विट केलं आहे. पाहा त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे:

‘केंद्र सरकारची एकमेव जमेची बाजू आणि सर्वाधिक कार्यक्षम मंत्रालय म्हणजे आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं रस्ते निर्माण मंत्रालय. सध्याच्या केंद्र सरकारमधील कुठला मंत्री सर्वाधिक आवडतो, असा प्रश्न देशातल्या नागरिकांना केला तर प्रत्येकाचं उत्तर नितीन गडकरी हेच असेल, यात कुठलीही शंका नाही.’

हे वाचलं का?

‘कॅग अहवालाच्या बातम्या वाचनात आल्या असल्या तरी याचा विस्तृत अभ्यास केलेला नाही, परंतु कॅग अहवालाच्या निमित्ताने केवळ गडकरी साहेबांच्या विभागावर लक्ष केंद्रित करून त्यांना जाणूनबुजून अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, असं वाटतं.’

हे ही वाचा >> Ulhasnagar: भयंकर.. ‘ज्या बोटाने भाजपला मतदान केलं तेच बोट मी तोडलं, फडणवीसांना…’

‘शेवटी मराठी माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिल्लीत होणारच आहे. केंद्र सरकारच्या अपयशी कारभारामुळं येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा विजयी होणार नाही हे स्पष्ट असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास गडकरी साहेब सर्वाधिक पसंतीचा चेहरा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्पूर्वीच त्यांचा पत्ता कट करुन त्यांना दूर सारण्याचा तर हा कट नाही ना, अशी शंका येते.’

ADVERTISEMENT

‘असो! महाराष्ट्र भाजपा गडकरी साहेबांसोबत असेल की नाही हे माहीत नाही, परंतु विकासाची दूरदृष्टी असलेल्या गडकरी साहेबांसोबत मराठी माणूस म्हणून मी नक्कीच उभा राहीन!’ असं म्हणत रोहित पवार यांनी एक प्रकारे नितीन गडकरी यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

कॅगचे आरोप आणि गडकरींचं मंत्रालयाचं उत्तर..

दिल्ली ते गुरुग्रामला जोडण्यासाठी द्वारका एक्सप्रेस वे बनवला जात आहे. पण कॅगने त्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हे वृत्त येताच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली. पण याबाबत आता सरकारकडून उत्तर देण्यात आलं आहे. ज्यामध्ये कॅगचा आक्षेप अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची.. ‘सामना’तून फडणवीसांना घायाळ करणारी टीका

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्याचे उत्तर दिले आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत हा एक्स्प्रेस वे बनवण्यात आला आहे. या एक्स्प्रेस वेसाठी कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडून मंजुरी घेण्यात आली होती. मंत्रालयाने सांगितले की, एक्स्प्रेस वेसाठी सरासरी 206.39 कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने निविदा जारी करण्यात आली होती.

परंतु 181.94 कोटी रुपये प्रति किलोमीटर दराने कराराचे अंतिम वाटप करण्यात आले. म्हणजेच सरकारने त्याच्या बांधकाम खर्चात 12 टक्के बचत केली आहे. कॅगने बांधकामाचा प्रत्यक्ष खर्च विचारात घेतला नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला.

कॅगच्या अहवालात काय म्हटले होते?

कॅगच्या अहवालानुसार, या 29.06 किलोमीटर लांबीच्या एक्स्प्रेस वेला कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडून निश्चितच मंजुरी मिळाली होती, परंतु 18.20 कोटी प्रति किलोमीटर बजेटप्रमाणे. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून त्याचे एकूण बजेट 7287.29 कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच 18.20 कोटींऐवजी प्रत्येक किलोमीटरवर सुमारे 251 कोटी रुपये खर्च झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT