No-Confidence Motion: ‘मोदीजी, तुम्ही मणिपूरमध्ये भारताची हत्या केली’, राहुल गांधींनी लोकसभा हादरवली!

रोहित गोळे

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर अत्यंत जहरी शब्दात पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. पाहा राहुल गांधी नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

no confidence motion in lok sabha rahul gandhi criticized pm modi said you killed india in manipur
no confidence motion in lok sabha rahul gandhi criticized pm modi said you killed india in manipur
social share
google news

Rahul Gandhi Lok Sabha Speech: नवी दिल्ली: लोकसभेत मोदी सरकारवर (Modi Govt) आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर (No-Confidence Motion) सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू आहे. आज (9 ऑगस्ट) कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाषण केलं. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना त्यांची खासदारकी बहाल केल्यानंतर आज पहिल्यांदा त्यांनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरून मोदी सरकारला अक्षरश: सळो की पळो करुन सोडलं. त्यांच्या भाषणावेळी सत्ताधारी खासदारांनी अनेकदा गदारोळ केला. मात्र, तरीही राहुल गांधींनी हल्लाबोल करणं सोडलं नाही. यावेळी त्यांनी थेट मोदींवर असा आरोप केला की, त्यांनी मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. (no confidence motion in lok sabha rahul gandhi criticized pm modi said you killed india in manipur marathi political news)

राहुल गांधींनी भाषणाची सुरुवात आपल्या भारत जोडो यात्रेच्या अनुभवाने केली. पण त्यांचा संबंध त्यांनी मणिपूरमध्ये सध्या जी हिंसा सुरू आहे त्याच्याशी जोडत मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.. त्यांच्या या भाषणाने त्यांनी लोकसभा अक्षरश: हादरवून सोडली.

‘मोदीजी तुम्ही भारतमातेची हत्या केली..’

मणिपूरमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘भारत हा एक आवाज आहे.. जर आपल्याला तो आवाज ऐकायचा असेल तर.. आपल्याला अंहकार आणि द्वेष मिटवावा लागेल.. काही दिवसांपूर्वीच मी मणिपूरला गेलो.. आपले पंतप्रधान नाही गेले.. आजवर गेलेले नाही.. कारण त्यांच्यासाठी मणिपूर हा हिंदुस्तान नाहीए. मी मणिपूर शब्दप्रयोग केला.. पण आजचं सत्य हे आहे की, मणिपूर शिल्लक राहिलेलं नाही.. मणिपूरला आपण दोन भागात विभागलं आहे, तोडलं आहे..’

हे ही वाचा >> No-Confidence Motion: ‘…तर मी तुमची औकात काढेल’, राणेंनी लोकसभेत का वापरले असे शब्द?

‘मी मणिपूरमध्ये मदत छावणीमध्ये गेलो.. मी महिलांशी बोललो, मुलांशी बोललो.. जे आपले पंतप्रधानांनी नाही केलं.. मी अनेक महिलांशी तिथे बोललो.. पण मी दोन उदाहरणं देतो.. एका महिलेला मी विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती महिला म्हणाली, माझा एकच छोटा मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घातली. आपण विचार करा.. आपल्या मुलांबाबत विचार करा..’

हे वाचलं का?

    follow whatsapp