PM Modi and CJI Chandrachud: 'फक्त PM मोदींनाच नाही तर...', 'त्या' भेटीबाबत नवी माहिती आली समोर
PM Modi CJI Chandrachud meet controversy: पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्याने एक नवा वाद सुरू झाला आहे. पण आता याबाबत नवी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेल्याने एक नवा वाद
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी PM मोदींसह अनेकांना दिलेलं निमंत्रण
मोदींसह अनेक सुप्रीम कोर्टाचे अधिकारीही होते CJI च्या घरी उपस्थित
PM Modi CJI Chandrachud Meet: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी (11 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजन समारंभात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासोबत गणपती बाप्पाची आरती करताना दिसले. हे संपूर्ण प्रकरण आता वादात सापडले आहे. पण आता याबाबत काही नवीन माहिती समोर आली आहे. (not just pm modi many vip were invited new revelation on ganesh aarti controversy at cji chandrachud residence)
पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी, पण नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रचूड यांनी पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांना गणपती पुजेसाठी निमंत्रित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि इतर अधिकाऱ्यांसह अनेक लोक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दररोज त्यांच्या घरी येत असतात.
हे ही वाचा>> Sanjay Raut: 'संविधान के घर को आग लगी...', PM मोदी सरन्यायाधीशांच्या घरी जाताच राऊत संतापले
जेव्हा PM मोदी हे चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजेसाठी गेले. त्यावेळी आणखी अनेक लोक सरन्यायाधीशांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी केवळ बाप्पाची आरती केली आणि त्यानंतर काही काळ प्रसाद घेऊन ते तिथून निघून गेले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निमंत्रित केलं होतं. जेव्हा पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी आले तेव्हा रजिस्ट्री स्तरावरील अधिकाऱ्यांसह सर्वोच्च न्यायालयाचे इतर अनेक अधिकारी देखील तिथे उपस्थित होते.
हे ही वाचा>> CJI DY Chandrachud: सरन्यायाधीशांच्या घरी PM मोदी, गणपती बाप्पांची केली खास आरती!
काय आहे प्रकरण?
गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान मोदी हे बुधवारी संध्याकाळी CJI DY चंद्रचूड यांच्या घरी पोहोचले होते. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून मोदींनी माहिती दिली होती. या छायाचित्रात पीएम मोदी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्यांची पत्नी कल्पना दास यांच्यासोबत गणपतीची पूजा करताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठी पोशाख परिधान केला होता. तसेच त्यांनी मराठीमोळी टोपीही परिधान केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT