Ajit Pawar : विरोधी पक्ष नेते सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची परंपरा कधीपासून सुरु झाली?
विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीच्या (NCP) एक गठ्ठा आमदारांना घेऊन पक्षात बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण
ADVERTISEMENT
मुंबई : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीच्या (NCP) एक गठ्ठा आमदारांना घेऊन पक्षात बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचं पत्रही असल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. अजित पवार यांनी या सगळ्या बातम्या सध्या तरी फेटाळून लावल्या आहेत. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे विरोधी पक्षनेतेच फुटणार का? आणि सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन बसणार का? असे सवाल विचारला जात होते. यापूर्वी महाराष्ट्रात 4 विरोधी पक्ष नेत्यांनी पदावर असताना सत्ताधाऱ्यांसोबत हातमिळविणी केल्याची उदाहरण आहेत. मग कोणी आपला पक्ष सोडला, कोणी विलिन केला तर कोणी थेट पक्ष घेऊनच सत्तेत सहभागी झाले. (Opposition leader Ajit Pawar is going to rebel in the party with a bunch of NCP MLAs.)
ADVERTISEMENT
शरद पवार :
शरद पवार यांनी 3 वेळा राज्याचं विरोधी पक्षनेते पद भूषविले आहे. 3 जुलै 1980 ते 1 ऑगस्ट 1981, 15 डिसेंबर 1983 ते 14 जानेवारी 1985, 21 मार्च 1985 ते 14 डिसेंबर 1986 या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. मात्र 7 डिसेंबर 1986 रोजी म्हणजे विरोधी पक्ष नेते असतानाच शरद पवार यांनी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबाद येथे त्यांचा समाजवादी काँग्रेस हा पक्ष राज्यातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये विलिन केला. तेव्हा शंकरराव चव्हाण काँग्रेसचे नेतृत्व करत होते. त्यानंतर 2 वर्षांनी शरद पवार दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
Ajit Pawar : मुद्दा भाजपसोबत जाण्याचा पण, पवारांनी संजय राऊतांना झापले!
नारायण राणे :
नारायण राणे : नारायण राणे यांनी 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या काळात राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले. तर त्यानंतर 22 ऑक्टोबर 1999 ते 19 ऑक्टोबर 2004, आणि 6 नोव्हेंबर 2004 ते 12 जुलै 2005 या काळात ते विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर पक्ष नेतृत्वाशी न पटल्याने राणे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन काही आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी अनेक वजनदार पदं भूषवली. त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. कालांतराने त्यांनी भाजपसोबत जाण्याचा मार्ग निवडला.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे :
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा संभाळली आहे. 12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 या काळात ते विरोधीपक्ष नेतेपदी होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत सहभागी होणाचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेतेपद सोडून राज्य सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले होते.
Ajit Pawar : भाजपसोबत जाण्याच्या चर्चादरम्यान पवारांचं शिंदेंना खरमरीत पत्र
राधाकृष्ण विखे पाटील :
सध्याच्या सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 23 डिसेंबर 2014 ते 4 जून 2019 या काळात विरोधीपक्ष नेते होते. जवळपास 20 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते. विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली होती. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करताच फडणवीस सरकारमध्ये त्यांना गृहनिर्माण मंत्रिपदाची धुरा देण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT