Sunil Tatkare: सगळे खासदार बाहेर गेले, पण सुनील तटकरे लोकसभेत एकटेच का बसले?
लोकसभेत अविश्वास प्रस्ताववर पंतप्रधान मोदी भाषण करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. पण एकटे सुनील तटकरे हे मात्र विरोधी बाकांवर बसून राहिले. जाणून घ्या त्यांनी नेमकं असं का केलं?
ADVERTISEMENT

Sunil Tatkare Lok Sabha: नवी दिल्ली: मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात (Modi Government) विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. ज्यामध्ये चर्चेच्या शेवटी आज (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींनी भाषण केलं. तब्बल 2 तास 13 मिनिटं हे भाषण सुरू होतं. ज्यामध्ये मोदींनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पण प्रामुख्याने त्यांनी काँग्रेसवर टीका केली. पण त्यांच्या भाषणाच्या अर्ध्यावरच विरोधकांनी सभात्याग केला. पण याचवेळी विरोधी बाकांवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) मात्र बसूनच राहिले. (opposition mps walked out of the house only sunil tatkare remained sitting on opposition benches while pm modi was speaking on no confidence motion in lok sabha)
पंतप्रधान मोदींनी तब्बल 2 तासाहून अधिक वेळ भाषण केलं. पण भाषणातील पहिले दीड तास ते मणिपूर हिंसाचारावर एकही शब्द बोलले. त्यामुळे बराच वेळ गदारोळ देखील घातला. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी बोलण्यास तयार नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी सुनिल तटकरे हे एकटेच बसलेले दिसून आले.
तटकरे सभागृहात का बसून राहिले?
2 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बंड केलं आणि त्यांनी भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये अजित पवारांसोबत खासदार सुनील तटकरे हे देखील गेले. मात्र, असं असलं तरीही लोकसभेत अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं अधिकृतरित्या नोंद झालेली नाही. त्यामुळे अद्याप तरी लोकसभेत राष्ट्रवादी हा एकच गट आहे. जो विरोधी बाकांवर बसतोय.. तिथेच सुनील तटकरे यांना बसावं लागत आहे.
#WATCH | Opposition MPs walk out of the Lok Sabha as Prime Minister Narendra Modi speaks on #NoConfidenceMotion pic.twitter.com/2kYKRBiP1Z
— ANI (@ANI) August 10, 2023