Pankaja Munde : 'तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ...', पंकजा मुडेंची भावनिक साद
Pankaja munde emotional post : माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा...आई बापाला दुःख देऊ नका..त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची... 15 जून पासून मी आभार दौरा करत आहे ...तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा..., अशी भावनिक पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
Pankaja munde emotional post : बीड लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonwane) यांनी भापजच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला होता. पंकजा मुंडेंचा हा पराभव अनेक कार्यकर्ते, समर्थकांना जिव्हारी लागला आहे. त्यात दोन कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांचा पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांनी आयुष्य संपवलं आहे. या घटनेनंतर आता पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहत कार्यकर्यांना भावनिक साद घातली आहे. (pankaja munde emotional post on social media supporter sachin munde died beed lok sabha election result)
ADVERTISEMENT
पंकजा मुंडे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहले आहे? हे जाणून घेऊयात.
पंकजा मुंडेंची पोस्ट जशीच्या तशी...
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही...मी लढत आहे संयम ठेवत आहे...तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा.कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे...मी पराभव स्वीकारला आहे आणि पचवला आहे, तुम्ही ही पचवा!! ..अंधाऱ्या रात्री नंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात.. शांत व सकारात्मक रहा please please..
हे वाचलं का?
हे ही वाचा : पुण्याचा माजी महापौरांची मोदींच्या मंत्रिमंडळात एन्ट्री, मुरलीधर मोहोळांचा राजकीय प्रवास
माझ्या साठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा...आई बापाला दुःख देऊ नका..त्यांच्या जीवाला घोर लावू नका.. तुम्हाला शप्पथ आहे..मुंडे साहेबांची... 15 जून पासून मी आभार दौरा करत आहे ...तो पर्यंत सर्व जण प्रतिक्षा करा..., अशी भावनिक पोस्ट पंकजा मुंडे यांनी केली आहे.
प्रकरण काय?
दरम्यान सचिन कोंडिबा मुंडे हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात यस्तर या गावचा रहिवासी होता. सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक होता. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही तर सचिन गेला असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी 7 जून म्हणजेच काल रात्री साडेआठ नंतर सचिनचा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बुलढाण्याचा खासदार होणार केंद्रीय मंत्री! कोण आहेत प्रतापराव जाधव?
अहमदपूर येथून मुक्कामाला निघालेली एसटी बस बोरगाव पाटीजवळ असणाऱ्या वळणाला बसचालकाला रस्त्यावर पडलेला इसम दिसला. घाईत बस चालकाने गाडी वळवली मात्र समोरच्या चाकापासून संरक्षण करता आलं मात्र मागील चाक सचिन मुंडे यांच्या अंगावरून गेलं. या घटनेत सचिन मुंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबतची माहिती किनगाव पोलिसांना देण्यात आली. किनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आता पोलीस पुढील तपास करत आहोत. पोलीस आणि एसटी महामंडळाच्या वाहन चालकांच्या माहितीनुसार हा अपघात आहे.
ADVERTISEMENT
बीडमध्ये तरूणाची गळफास लावून आत्महत्या
बीड जिल्ह्यातील डिघोळ अंबा येथील युवकाने देखील पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने शेतातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पांडुरंग रामभाऊ सोनवणे ( वय. 30 वर्षे, रा डिघोळ अंबा ता अंबाजोगाई जि. बीड) असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पांडुरंग याने आत्महत्या केल्याची घटना गावात पसरली त्यानंतर युसुफवडगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत सदरील मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून त्याच्या गावी डिघोळ अंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पांडुरंग याचे 2016 ला लग्न झाले होते. मुलगा चंद्रकांत (वय 8) तर मुलगी पूजा (वय 11 ) आणि पत्नी ,आई वडील असा परिवार आहे. पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक असून तो ऊसतोड कामगार होता.
दरम्यान या संदर्भात युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस मच्छिंद्र शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता पांडुरंग सोनवणे याने पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती मुंबई तकला दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT