Pankaja Munde : पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू
Pankaja Munde BJP : बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संसदेत पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची महाराष्ट्र भाजपची विनंती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समीकरणांची बेरीज
देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांकडे मागणी केल्याची माहिती
Pankaja Munde Latest News : लोकसभा निवडणुकी बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संसदेत पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवण्यात यावे, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. सकाळ वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. भाजपने राज्यसभेत पाठवले, तर पंकजा मुंडेंचं खासदारकीची इच्छा पूर्ण होऊ शकते. (Pankaja Munde is likely to be sent to Rajya Sabha by BJP)
ADVERTISEMENT
पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभेला पराभव, राज्यसभेवर वर्णी?
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. या पराभवानंतर काही जणांनी आत्महत्याही केल्या.
हे वाचलं का?
हेही वाचा >> भाजपसमोर मोठा 'पेच'! एकनाथ शिंदे-अजित पवार करणार का 'त्याग'?
ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणूक... राजकीय बेरीज काय?
लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. सामाजिक गणितांचाही फटका बसल्याची चर्चा आहे. आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने नाराज झालेल्या सामाजिक घटनांना परत आणण्यावर मंथन सुरू केले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका", थेट लोकसभा महासचिवांना नोटीस
पंकजा मुंडे 2019 पासून बाजूला गेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमुळे त्या चर्चेत आल्या. पण, आता त्यांचे पुनर्वसन करुन भाजप ओबीसींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT
राज्यसभेच्या तीन जागा रिक्त
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार आहे. उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आले आहे, तीही एक जागा रिक्त होत आहे. पीयूष गोयल यांचीही जागा रिक्त झाली आहे. या तिन्ही जागा भाजपच्या आहेत, मात्र एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते.
हेही वाचा >> अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना का दिली नाही उमेदवारी? 'हा' आहे प्लॅन
सातारा लोकसभेच्या जागेच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसले लोकसभेवर गेल्यास त्यांची जागा मागितली होती. त्याबद्दल काय निर्णय होणार, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दोन जागांपैकी एका जागेवरून पंकजा मुंडेंना राज्यसभेत पाठवले जाऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT