James Marape : PM मोदींच्या पाया पडणारे पापुआचे PM अत्यंत चालाख, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच करतात!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

papua new guineas pm specializes in defeating political opponents know james marape who touched pm modis feet
papua new guineas pm specializes in defeating political opponents know james marape who touched pm modis feet
social share
google news

James Marape: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे रविवारी (22 मे) तिसऱ्या इंडो-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन (FIPIC) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पापुआ न्यू गिनीमध्ये आले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पापुआ न्यू गिनीचे (Papua New Guinea) पंतप्रधान जेम्स मारापे (James Marape) यांनी स्वत: पंतप्रधान मोदींचे विमानतळावर येऊन स्वागत केले. मरापे यांनी प्रथम पंतप्रधान मोदींना मिठी मारली, नंतर चक्क वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला. (papua new guineas pm specializes in defeating political opponents know james marape who touched pm modis feet)

ADVERTISEMENT

पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पीएम मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत, ज्यांच्यासाठी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी जगातील कोणत्याही नेत्यासाठी जे केले नाही ते केले आहे.

पापुआ न्यू गिनीमध्ये त्यांच्या भव्य स्वागताने भारावून गेलेल्या पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘पापुआ न्यू गिनीला पोहोचलो आहे. पंतप्रधान जेम्स मारापे यांनी विमानतळावर येऊन माझे स्वागत केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे एक अतिशय विशेष स्वागत आहे जे माझ्या नेहमी लक्षात राहील. माझ्या भेटीदरम्यान या महान देशासोबत भारताचे संबंध वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पंतप्रधानांसमोर झकले, जुनी परंपराही मोडली, मोदींसाठी देशाने ‘हा’ नियम मोडला

ADVERTISEMENT

त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी लिहिले की, ‘पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचाविषयी आदर दर्शवला. हे प्रभावी चित्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाचे आणि प्रभावाचे उदाहरण आहे. या व्हिडीओसोबतच पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे हे देखील चर्चेत आले आहेत.

ADVERTISEMENT

कोण आहे जेम्स मारापे?

  • 52 वर्षीय मारापे 2019 पासून पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान आहेत. ते पांगू पाटी (PANGU Pati) या राजकीय पक्षाशी संबंधित आहे.
  • 24 एप्रिल 1971 रोजी जन्मलेल्या मारापेंनी 1993 मध्ये पापुआ न्यू गिनी विद्यापीठातून कला शाखेत पदवी प्राप्त केली. त्यांच्याकडे पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.
  • मारापे हे पापुआ न्यू गिनीचे 8वे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाची मंत्रिमंडळातील पदे भूषवली आहेत.
  • यापूर्वी ते नॅशनल पीपल्स काँग्रेसचा एक भाग होते. परंतु 2019 मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि PANGU पक्षात प्रवेश केला.
  • द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये त्यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता परंतु सरकार पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला.
  • मारापे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर

अत्यंत चालाख पंतप्रधान…

10 नोव्हेंबर 2020 रोजी पापुआ न्यू गिनीच्या संसदेत मारापे यांच्या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. मात्र, मारापे यांनी आपल्या राजकीय कौशल्याने विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला.

Photo- AFP

 

यादरम्यान, पापुआ न्यू गिनीच्या राजकारणात असेच काहीसे घडले, जे भारतातील अनेक राज्यांमध्ये घडत आहे. या राजकीय संकटाच्या काळात पापुआ न्यू गिनीमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू झालं होतं. पापुआ न्यू गिनीचे संसद सदस्य दोन गटात विभागले गेले होते. 110 खासदार असलेल्या संसदेत 55 खासदार विरोधी गटासोबत होते, तर 53 खासदार जेम्स मारापे यांच्यासोबत होते. तर दोन सदस्यांपैकी एक सभापती व दुसरा उपसभापती होता. जेम्स मारापे यांनी स्पीकर आपल्या बाजूने वळवून घेत अर्थसंकल्प मंजूर करून घेतला होता.

हे ही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं…

दरम्यान, मारापे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असता 18 खासदारांनी विरोधी गटातून अचानक सरकारच्या बाजू मतदान केलं. यामुळे मारापे यांचे संसदेतील संख्याबळ 70 वर पोहोचले. जो भक्कम पाठिंब्याचा पुरावा होता. यासह जेम्स मारापे यांनी सरकारवर नियंत्रण मिळवलं. 2022 मध्ये या देशात निवडणुका झाल्या तेव्हा मारापे यांचा पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि जेम्स मारापे पुन्हा पंतप्रधान झाले.

जेम्स मारापेंचे खाजगी आयुष्य

  1. जेम्स मारापे हे हुली गटातून येतात, जो देशातील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायांपैकी एक आहे. मारापे यांचे वडील धर्मगुरू होते आणि त्यामुळे मारापे हे चर्च आणि त्यासंबंधीच्या राजकारणत अधिक जवळचे समजले जातात.
  2. शपथ घेताना मारापे म्हणाले की पापुआ न्यू गिनी हा जगातील सर्वात श्रीमंत कृष्णवर्णीय ख्रिश्चन देश व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.
  3. मारापेचे लग्न रेचेल मारापेशी झाले आहे, ज्या मूळच्या देशाच्या पूर्व सेपिक प्रांतातील आहे. या दोघांना एकूण सहा मुले आहेत.

भारत आणि पापुआ न्यू गिनीचे चांगले संबंध

भारत आणि पापुआ न्यू गिनी यांचे मजबूत संबंध आहेत. 2020-21 मध्ये, जेव्हा हा देश कोरोना महामारीशी झुंज देत होता आणि त्यांच्याकडे कोव्हिडविरोधी लस नव्हती, तेव्हा भारताने कोव्हिड लसीचा मोठा साठा पाठवला होता. ज्याचा पापुआ न्यू गिनीला खूप फायदा झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT