पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीआधीच आप-काँग्रेसचं बिनसलं, काय टाकली अट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

a split is visible in the opposition unity. Actually, the Aam Aadmi Party has given an ultimatum to the Congress. AAP says that if the Congress does not support the Delhi ordinance, the party will boycott the opposition meeting in patana.
a split is visible in the opposition unity. Actually, the Aam Aadmi Party has given an ultimatum to the Congress. AAP says that if the Congress does not support the Delhi ordinance, the party will boycott the opposition meeting in patana.
social share
google news

Opposition Meeting in Patna : नितीश कुमार यांनी शुक्रवारी 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. पण, बैठकीच्या एक दिवस आधीच काँग्रेस आणि आपमध्ये शिलगली आहे. त्यामुळे विरोधकांच्या ऐक्याआधीच फुटीची चिन्हे दिसू लागली आहे. दिल्ली, पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. दिल्लीतील अधिकाराबद्दलच्या केंद्राच्या अध्यादेशाविरोधी भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा न दिल्यास पक्ष विरोधी बैठकीवर बहिष्कार टाकेल, असा इशारा आपने दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे की, काँग्रेसने दिल्लीतील अधिकारांबद्दल केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या मुद्द्यावर पाठिंबा न दिल्यास पक्ष विरोधी पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकेल.

केंद्राचा वटहुकुम, आपचे विरोधकांना साकडे

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये अधिकारांवरून बराच संघर्ष सुरू आहे. नुकताच दिल्लीतील केजरीवाल सरकार विरुद्ध लेफ्टनंट गव्हर्नर खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. यामध्ये निवडून आलेल्या सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार देण्यात आले. यानंतर केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण’ स्थापन करण्याचा अध्यादेश आणला आहे. हा अध्यादेश जारी झाल्यापासून केजरीवाल देशभरातील विरोधी नेत्यांच्या भेटी घेत त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Darshana Pawar : ‘डिलिव्हरी बॉय’चे काम करून MPSCची तयारी; राहुल हंडोरे इतका क्रूर का झाला?

या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी सहा महिन्यांत संसदेची मंजूरी आवश्यक आहे. केंद्र सरकारकडे बहुमत असल्याने ते लोकसभेत सहज मंजूर होणार आहे. पण, राज्यसभेत विरोधी पक्ष एकत्र आल्यास आकड्यांच्या खेळात भाजपचा पराभव होऊ शकतो, अशी केजरीवाल यांना आशा आहे.

विरोधकांच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये अध्यादेशाचा मुद्दा घ्यावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी बैठकीच्या मुख्य अजेंड्यात दिल्ली सरकारविरुद्ध केंद्राच्या अध्यादेशाचा मुद्दा समाविष्ट करण्याची मागणी केली. केजरीवाल यांनी विरोधी पक्षांना पत्र लिहून केंद्राच्या अध्यादेशावर चर्चेची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

अध्यादेश हा महत्त्वाचा मुद्दा नाही – काँग्रेस

बिहार काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, अरविंद केजरीवाल म्हणत असलेला अध्यादेशाचा मुद्दा महत्त्वाचा नाही. या बैठकीत यावर चर्चा होऊ शकते, पण खरा मुद्दा हा आहे की 2024 मध्ये भाजपला हरवायचे कसे? त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे.

ADVERTISEMENT

खरगे यांनी केजरीवाल यांना भेटण्यासाठी दिला नाही वेळ

यापूर्वी केजरीवाल यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन अध्यादेशावर त्यांचा पाठिंबा मागितला होता. यानंतर केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, आजपर्यंत केजरीवाल यांना खरगे आणि राहुल गांधी यांनी वेळ दिलेला नाही. वास्तविक काँग्रेस पक्षाचे नेते केजरीवाल यांना पाठिंबा देण्याच्या बाजूने नाहीत.

हेही वाचा >> Udayanraje Bhosale: दोन्ही राजांमध्ये असं काय घडलं… की, फडणवीसांनी गाठलं थेट सातारा!

पाटण्यात बैठक

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी नितीश कुमार यांनी विरोधकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात येणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी नेते 22 जूनपासूनच पाटण्याला पोहोचणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीपी सुप्रीमो आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पाटणा येथे पोहोचल्या आहेत. त्याचवेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संध्याकाळी पोहोचणार आहेत. टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे देखील बॅनर्जी यांच्यासोबत असतील. पाटण्याला पोहोचल्यानंतर ममता थेट RJD सुप्रीमो लालू प्रसाद यांना त्यांच्या 10, सर्कुलर रोड या निवासस्थानी भेटणार आहेत. आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील आजच पाटण्याला पोहोचले आहेत.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा

या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा आणि पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चर्चा होणार नसल्याचे बिहारचे मंत्री विजय चौधरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, देशातील सरकार बदलाबाबत पाटण्यामध्ये चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही अभिमानाची बाब आहे. ही ऐतिहासिक बैठक आहे. असा प्रसंग कधीच घडला नाही. ते म्हणाले की, विरोधकांना एकत्र करून भाजपशी लढण्याचा अजेंडा आधीच जाहीर करण्यात आला आहे. निमंत्रित असलेले सर्व विरोधी पक्ष नेते येत आहेत. नुकतेच, अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून प्रथम विरोधी पक्षांच्या बैठकीत संसदेत अध्यादेशाच्या पराभवावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT