Narendra Modi : PM मोदींचा शरद पवारांवर मोठा आरोप?, यवतमाळमधून तुफान टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमधील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. 'इंडिया आघाडीचे जेव्हा केंद्रात सरकार होतं, तेव्हा काय परिस्थिती होती.
pm narendra modi criticize sharad pawar and cogress yavatmal rally maharashtra politics
social share
google news

PM Narendra Modi Criticize Sharad pawar : 'इंडिया आघाडीचे केंद्रात जेव्हा सरकार होते. तेव्हाचे कृषीमंत्री हे महाराष्ट्राचे होते. त्यावेळी दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित व्हायचे, पण मधल्या मध्येच ती लुटली जायची',अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शरद पवारांवर (Sharad Pawar) केली आहे. तसेच काँग्रेस सरकारच्या काळात दिल्लीतून 1 रूपया निघायचा आणि 15 पैसेच पोहचायचे, अशी टीका मोदींनी (Pm Narendra Modi) काँग्रेसवर केली आहे. (pm narendra modi criticize sharad pawar and cogress yavatmal rally maharashtra politics) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमधील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोदींनी शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. 'इंडिया आघाडीचे जेव्हा केंद्रात सरकार होतं, तेव्हा काय परिस्थिती होती.. तेव्हा तर कृषीमंत्री हे देखील महाराष्ट्रातीलच होते. त्यावेळी दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज घोषित होत होतं. पण ते मधल्या मध्येच लुटली जायची. गाव-गरीब शेतकरी यांना काहीही मिळायचं नाही', अशी टीका त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली. पण मी आज एक बटण दाबलं आणि पीएम किसान निधीचे 21 हजार कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले.. हीच तर मोदींची गॅरंटी आहे, असे मोदींनी सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha : जरांगेंच्या उमेदवारीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

दरम्यान जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दिल्लीतून 1 रुपया निघत होता. पण 15 पैसेच पोहचायचे. काँग्रेसचं सरकार असतं तर आज तुम्हाला जे 21 हजार कोटी मिळाले आहेत. त्यातील 18 हजार कोटी हे मधल्या मधेच लुटले गेले असते. पण आता भाजप सरकार असताना गरीबांचे संपूर्ण पैसे गरीबांनाच मिळत आहे. मोदीची गॅरंटी आहे की, प्रत्येक लाभार्थीला पै न पै खात्यात मिळतील, असा मोदींनी विश्वास व्यक्त केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2014 पुर्वी देशातील गावात हाहाकार होता, मात्र इंडिया आघाडीला याची कोणतीच काळजी नव्हती. आझादीपासून ते 2014 पर्यंत 100 मधून फक्त 15 घरांमध्ये नळाने पाणी यायच. यामध्ये गरीब, दलित, आदीवासी होते त्यांना याचा लाभच मिळायचा नाही. हे आपल्या माता-भगिणीवर संकट होते. पण लाल किल्यावर मोदींनी हर घर जल पोहोचवण्याची गॅरंटी दिली. त्यामुळे 100 मधून 75 टक्के लोकांच्या घरी पाणी आले आहे. मोदीची गॅरटी म्हणजे गॅरंटी पुर्ण होण्याची गॅरंटी आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : 'मविआची लपवाछपवी..', वंचितचं 'ते' पत्र जसंच्या तसं...

 10 वर्षापर्वी यवतमाळमध्ये आलो होतो, देशाच्या जनतेने तेव्हा आम्हाला 300 पार पोहोचवलं होतं. 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात आलो होतो, त्यावेळी देखील एनडीएला 350 च्या पार केले होते. आज 2024 मध्ये विकासाच्या उत्सवात सामील व्हायला आलो आहे, मला आशा आहे की 2014 आणि 2019 प्रमाणे तुमचे आशीर्वाद मिळतील. संपूर्ण विदर्भाने एनडीए सरकार 400 पार ठरवले आहे,असे मोदी यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT