Sanjay Raut : जरांगेंना उमेदवारी देणार का? राऊतांनी थेट...

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागावाटप सुरळीत पार पडला आहे आणि कोणत्याही जागेवरून पक्षात मतभेद नाही आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले
maha vikas aghadi seat sharing meeting sanjay raut share details press manoj jarange vanchit bahujan aghadi prakash ambedkar maharashtra politics
social share
google news

Maha Vikas Aghadi Seat Sharing Meeting, Sanjay Raut : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जागावाटप सुरळीत पार पडला आहे आणि कोणत्याही जागेवरून पक्षात मतभेद नाही आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्याचसोबत मनोज जरांगेंचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही आहे. आणि आता जागावाटपावर कोणत्याही बैठका होणार नाही, जागावाटप सुरळीत पार पडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. (maha vikas aghadi seat sharing meeting sanjay raut share details press manoj jarange vanchit bahujan aghadi prakash ambedkar maharashtra politics)  

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीची सलग दुसऱ्या दिवशी जागावाटपाटची बैठक पार पडली आहेत. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन बैठकीतला तपशील सांगितला आहे. दरम्यान या बैठकीआधी वंचित बहूजन आघाडीकडून 27 जागांचा आणि जालन्यातून जरांगे पाटील आणि पुण्यातून डॉ. अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, वंचितने 27 जागांचा कोणताही फॉर्म्युला सांगितला नाही आहे. आणि प्रस्ताव आणि इच्छा व्यक्त करणं याच फरक असतो. तसेच मनोज जरांगेचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  

हे ही वाचा :मोदी यवतमाळमध्ये पण, चर्चा 2014 मध्ये दिलेल्या गॅरंटीची!

वंचितच्या 27 जागांच्या फॉर्म्युल्यावर संजय राऊत म्हणाले की, वंचितचा प्रस्ताव दिसायला मोठा दिसला तरी गेल्या काही वर्षात त्यांनी काही मतदार संघात काम केले आहे. त्यांनी त्या मतदार संघाची यादी दिली, त्यावर आम्ही चर्चा करत आहोत. पण वंचितने 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सा्ंगितला नाही,इच्छा व्यक्त करण यात फरक आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  

हे वाचलं का?

तसेच आम्ही देखील 48 जागांवर काम करतो. काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 48 मतदार संघात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48 आहेत ना, त्या आम्हाला वाटूनच घ्याव्या लागतील. त्यामुळे ज्या पक्षाची ताकद ज्या मतदार संघात आहे, त्या जागेवर आम्ही चारही पक्ष मिळून चर्चा करतो आहे. आजची बैठक निर्णायक झालेली आहे.जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडला. जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाही आहेत.त्यामुळे प्रत्येक लोकसभेच्या जागेवर आमची चर्चा झाली आहे. कोण कुठे जिंकेल यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे आता जागावाटपावर कोणतीही बैठक होणार नाही. आता प्रमुख नेते जागावाटप जाहीर करतील,असे संजय राऊत म्हणाले आहेत. 

हे ही वाचा :अनामिकाने आधी पोस्ट शेअर केली, नंतर पतीनेच झाडल्या गोळ्या, व्हिडीओ व्हायरल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT