‘संजय राऊत म्हणजे थुकलेले पान’, भाजप आमदार नितेश राणेंकडून जहरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Narendra Modi:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार  युद्ध रंगले आहे. नरेंद्र मोदी आज नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये (Nashik Kalaram Mandir) जाऊनही दर्शन घेणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरूनच आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. नितेश राणे यांनी टीका करताना अगदी पातळी सोडून त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणजे थुकलेले पान असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि नितेश राणे यांचा वाद रंगण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

ADVERTISEMENT

राऊतांची वायफळ बडबड

खासदार संजयर राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आज भारतात आहेत. या दौऱ्यात नाशिक येथे मंदिरात जाऊन मोदी दर्शन घेणार आहेत, मात्र उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात  22 रोजी जाऊन दर्शन घेणार आहेत, म्हणून मोदी काळाराम मंदिरात जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले की, ही त्यांची वायफळ बडबड करत आहेत. मात्र ते पंतप्रधानांवर बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. मात्र संजय राऊत म्हणजे थुकलेले पान असल्याची जहरी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

हे ही वाचा >> Sharad Mohol : मोहोळ हत्येचे कराड कनेक्शन! पुणे पोलिसांनी एकाला केली अटक

मालकाच्या घरात बॉक्सिंग

संजय राऊत यांच्याकडून टीका करताना ते मोदींबरोबरच ते फडणवीसांवरही टीका करताता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पवनपुत्र हनुमानाच्या रुपात जाऊन तुमच्या मालकाची लंका जाळली असल्याचा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी टीका करताना विनाकारण पवनपुत्र रुपात असलेल्या फडणवीस यांच्या नावाने उगाच  खडी फोडू नये. कारण तुझ्या मालकाच्या घरात बॉक्सिंग मॅच सुरू आहे, त्याची आधी माहिती द्या अशा शब्दातही त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे वाचलं का?

मोदींच्या भेटीसाठी तडफड

यावेळी नितेश राणे यांनी खासदार राऊतांवर टीका करत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. मात्र जे आदित्य ठाकरे भाजपच्या नेत्यांवर टीका करतात ते आदित्य ठाकरे दिल्लीत मोदींच्या भेटीसाठी तडफडत असतात अशा शब्दातही त्यांनी त्यांचां समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे दलाल

नितेश राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावे की, ते भाजपकडे पायघड्या घालत आहेत की नाही असा सवालही त्यांनी त्यांना केला आहे. भाजपच्या पायघड्या घालत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे दलाल असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंचा काय संबंध?

यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राम मंदिराचा काहीही संबंध नसल्याचे सांगत काळाराम मंदिराच्या दर्शनावरूनही त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राम मंदिरावरून राज्यातील राजकारण तापले असून संजय राऊत राम मंदिराच्या नावावरून विनाकारण वायफळ बडबड करत असल्याचा निशाणाही त्यांनी त्यांच्यावर साधला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sharad Mohol: ‘मुळशी पॅटर्न’ ज्यावरुन आला त्या ‘मोहोळ गँग’चा रक्तरंजित इतिहास! A टू Z स्टोरी…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT