NCP चे 70 हजार कोटींचे घोटाळे, सुप्रिया सुळे…, PM मोदींचा शरद पवारांवर पहिला ‘वार’

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सध्या एक नवीन शब्द खूप लोकप्रिय केला जात आहे, तो म्हणजे ग्यारंटी (हमी). भाजपच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे की, त्यांनी लोकांना सांगावं की विरोधक कोणत्या गोष्टीची ग्यारंटी आहे.”

ADVERTISEMENT

pm narendra modi allegations on sharad pawar's ncp of 70 thousand crore
pm narendra modi allegations on sharad pawar's ncp of 70 thousand crore
social share
google news

PM Narendra Modi Vs Sharad Pawar : पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पहिला हल्ला चढवला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झालेल्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी थेट काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांसह शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘वार’ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सध्या एक नवीन शब्द खूप लोकप्रिय केला जात आहे, तो म्हणजे ग्यारंटी (हमी). भाजपच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठी जबाबदारी आहे की, त्यांनी लोकांना सांगावं की विरोधक कोणत्या गोष्टीची ग्यारंटी आहे. हे सगळे लोक, हे पक्ष हमी (ग्यारंटी) आहे भ्रष्टाचाराची. हे हमी आहे की, लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्यांची.”

“काही दिवसांपूर्वी यांचा भेटून फोटो काढण्याचा एक कार्यक्रम झाला. या बैठकीत सहभागी झालेल्या पक्षाच्या इतिहास बघितला तर कळेल की, त्या सगळे मिळून कमीत कमी 20 लाख कोटींच्या घोटाळ्यांची ग्यारंटी आहेत. काँग्रेसचा घोटाळाच लाखो, करोडोंचा आहे”, असं मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?

“एक लाख 86 हजारांचा कोळसा घोटाळा, 1 लाख 74 कोटींचा टू जी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा आहे. 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, हेलिकॉप्टरपासून युद्धनौकापर्यंत एकही क्षेत्र नाही, जिथे काँग्रेसने घोटाळा केलेला नाही”, असं टीकास्त्र मोदींनी काँग्रेसवर डागलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp