‘आव्हाडांसह 2-3 जण प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले’,छगन भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यासंदर्भात काय झाली होती चर्चा? शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर काय घडलं? छगन भुजबळांनी काय सांगितलं?
ADVERTISEMENT

Politics Of Maharashtra : शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर रंगलेलं नाट्य महाराष्ट्राने आणि देशाने बघितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याची मागणीही काही नेत्यांनी केली. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्याबैठकीत काय घडलं होतं, याबद्दल छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर या सगळ्या आमदारांना विश्वास नव्हता का? सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार हा पक्ष पुढे घेऊन जातील असं आमदारांना वाटत होतं का?’
वाचा >> 30 जून! अजित पवारांच्या ‘या’ बैठकीतच झाला शरद पवारांना धक्का देण्याचा प्लॅन
भुजबळ म्हणाले, “सुरुवातीला जेव्हा साहेबांनी (शरद पवार) राजीनामा दिला. तेव्हा सुरूवातीलाच मी हा मुद्दा मांडला होता. साहेबांनी (शरद पवार) मला दुसऱ्या दिवशी विचारलं की, तुम्ही तर एकदम वाटणी करून टाकली. मी त्यांना म्हणालो की, काय करणार साहेब? तुम्ही निर्णय जाहीर करता आणि आम्हाला सांगत नाही. त्यामुळे आम्हाला काय वाटतं हे आम्ही तुम्हाला सांगत नाही आणि जाहीर करून टाकतो.”
“मी काय जाहीर केलं होत? मी म्हणालो होतो की, सुप्रिया सुळे दिल्लीत सर्वांच्या ओळखीच्या आहेत. अध्यक्षा म्हणून त्या काम करतील. महाराष्ट्राचं काम हे अजित पवार करतील. काय चुकलं होतं? हेच तर मी बोललो होतो. कुठे प्रश्न आला होता?”, असा उलट सवाल भुजबळ यांनी केला.