MVA : प्रज्ञा सातव अडचणीत? ठाकरेंच्या खासदाराचे थेट काँग्रेसच्या महासचिवांना पत्र

मुंबई तक

Nagesh Patil Ashtikar Pradnya Satav : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांची काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार केली आहे.

ADVERTISEMENT

प्रज्ञा सातव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांची काँग्रेसकडे तक्रार केली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रज्ञा सातव यांच्यावर नागेश पाटील आष्टीकर यांचे गंभीर आरोप

point

काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांना पत्र

point

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली कारवाईची मागणी

Nagesh Patil Ashtikar Pradnya Satav : (ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली) लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांची थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. सातव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे. (MP Nagesh Patil Ashtikar has Wrote letter to congress for action against Pragya Satav)

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नागेश पाटील आष्टीकर काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

प्रज्ञा सातवांनी वंचित बहुजन आघाडी, महायुतीला पाठिंबा दिला

नागेश पाटील आष्टीकर यांनी असा आरोप केला आहे की, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या हिताच्या विरोधात काम केले. त्यांनी पक्षाचे निर्देश पाळले नाहीत आणि विरोधकांना पाठिंबा दिला. 

हेही वाचा >> पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट; नेमकं काय घडलं?

आष्टीकरणांनी पत्रात म्हटले आहे की, प्रज्ञा सातव यांनी वंचित बहुजन आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांच्या या कृतीमुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि आपल्या समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रचारादरम्यान, त्या कोणत्याही सभेत सहभागी झाल्या नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp