’10 वर्षापूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा पण आता…’, मोदींनी मुंबईत येताच केला प्रहार

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी अटल सेतूचे उद्घाटन करताना हा अटल सेतू हा महाराष्ट्राच्या विकासाचं प्रतीक असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांचाही जोरदार समाचार घेतला.

ADVERTISEMENT

Prime Minister Narendra Modi criticizes his opponents over the scam of thousands of crores
Prime Minister Narendra Modi criticizes his opponents over the scam of thousands of crores
social share
google news

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वेगवेगळ्या योजनांचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी नाशिकसह  मुंबईत शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे (Shivadi-Nhava Sheva Atal Setu) उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाची गॅरेंटी महाराष्ट्र पुढं घेऊ जात असल्याचे मत व्यक्त करत अटल सेतू हा महाराष्ट्राच्या विकासाचं प्रतीक असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राजकारणातील घराणेशाही संपवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचा दौरा करत काळाराम मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेसचे नाव न घेता त्यांनी राजकारणातील घराणेशाही संपवा आणि युवावर्गाने राजकारणात सक्रिय व्हा असं सांगत त्यांनी युवावर्गाला राजकारणात येण्याचंही आवाहन केले.

अटल सेतू विकासाचं प्रतीक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतू लोकार्पण कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, अटल सेतू हे मराहाष्ट्राच्या विकासाचं प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबईलाही एक बुलेट ट्रेनदेखील मिळणार असून भारताच्या विकासासाठी समुद्रालाही टक्कर देऊ असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा >> Kalaram Mandir History : काळाराम हे नाव कसं पडलं? प्रभू रामाचं कसा आहे संबंध?

हा प्रदेश देशाचे आर्थिक हब

आजचा दिवस महाराष्ट्रासह विकसित भारतासाठी महत्वाचा असल्याचे सांगत त्यांनी मुंबईतील विकास कामांविषयी बोलताना महाराष्ट्रात अनेक प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील शिवडी-न्हावा शेवा सेतूचं लोकार्पण करताना  त्यांनी सांगितले की, रायगड आणि मुंबईमधील हा प्रदेश देशाचे आर्थिक हब बनणार असून त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp