Narendra Modi यांनी ओबीसींसाठी नेमकं केलं काय? राहुल गांधींनी पंतप्रधानांना घेरलं
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. महिला आरक्षण विधेयकाबरोबरच त्यांनी ओबीसीवरही सवाल करुन त्यांच्यावर टीका केली आहे. नरेंद्र मोदी सांगतात की, मी ओबीसींसाठी काम करतो पण ते नेमकं काय काम करतात असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) विशेष अधिवेशन बोलवत त्यांनी महिला आरक्षण विधेयकाची (Women Reservation Bill) घोषणा केली. त्यानंतर आज काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आजही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महिला आरक्षण चांगलेच असून ते तात्काळ लागू करण्याची मागणीही केली आहे. तसेच त्यांनी सीमांकन आणि जनगणनेबाबतचे विधेयक काढून टाकावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी विशेष अधिवेशनावर (Special Session) टीका करताना म्हणाले की हे विशेष अधिवशन का बोलवण्यात आले होते ते माहिती नव्हते. मात्र नंतर त्याच अधिवेशनामध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आणले जात असल्याचे सांगण्यात आले. (exactly pm narendra modi obc community rahul gandhi criticizes, immediately implement Women reservation bill)
ADVERTISEMENT
सरकार काही करणार नाही
महिला आरक्षण विधेयक चांगले आहे. मात्र त्याआधी जनगणना करण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. जनगणना आणि सीमांकन या दोन्ही गोष्टी यासाठी महत्वाच्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आरक्षण आजही लागू केले जाऊ शकते, आणि ही फार अवघड गोष्ट आहे असंही नाही. मात्र हे सरकार तसं काही करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
दहा वर्षांनी लागू होईल
महिला आरक्षण विधेयक जरी सादर केले असले तरी ते आतापासून दहा वर्षांनी लागू होईल. तसेच हेही खरं आहे की, हे विधेयक किती लागू करतील याबाबतही शंका आहे. त्यामुळे सरकारकडून फक्त लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार केला असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्या ओबीसी वक्त्यव्यावरून त्यांच्या जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात येत आहे की, मी ओबींसीसाठी प्रचंड काम करत आहे. ते एवढं काम करत असतील तर संसदेतील 90 सचिवां पैकी फक्त तीनच सचिव पुढं कसं काय असा सवाल त्यांनी केला आहे.
हे वाचलं का?
जातिनिहाय जनगणना
राहुल गांधी यांनी यावेळी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली यावेळी ते म्हणाले की, जातिनिहाय जनगणना त्यांना करायची नाही त्यासाठी त्यांना नागरिकांची दिशाभूल करायची आहे, मात्र देशातल्या ओबीसींची संख्या नेमकी किती आहे? हे आम्हाला समजलंच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेऊन जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी अगदी आक्रमकपणे केली.
ओबीसी समाजासाठी काय केले
ज्या प्रकारे त्यांनी ओबींसीबाबत पंतप्रधानांना सवाल केला त्याच प्रमाणे त्यांनी त्यांना दुसरा सवालही उपस्थित केला. ओबीसीसाठी अर्थसंकल्पामध्ये अधिकारी लोकं अर्थसंकल्प किती प्रमाणात नियंत्रित करत आहेत. मात्र माहिती काढल्यानंतर समजलं की, फक्त 5 टक्केच नियंत्रणात आणले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी मी ओबीसीसाठी काम करत असल्याचे सांगितले तरी त्यांनी नेमकं ओबीसी समाजासाठी काय केले असा सवालही त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ते मूर्तीसारखे खासदार
राहुल गांधी यांनी ओबीसी खासदारांबाबतही टिकाटिपणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, जे खासदार लोकसभेत आहेत, ते मूर्तीसारखे खासदार आहेत. त्यांना कोणताही अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT