'राहुलला गोळ्या घालून मारलं पाहिजे... ठेचा आणि गाडा', उदयनराजे प्रचंड भडकले
अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलेल्या वादग्रस्त विधानावर आता खासदार उदयनराजे भोसले हे प्रचंड संतापले आहेत. पाहा त्यांनी नेमकी काय टीका केली.
ADVERTISEMENT

सातारा: अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरून आता भाजप खासदार आणि छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अशी विधानं करणाऱ्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे, जिथे दिसेल तिथे ठेचा आणि गाडा..' असं म्हणत उदयनराजेंनी सोलापूरकरवर जोरदार टीका केली.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
पाहा राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे नेमकं काय म्हणाले
'या जगाच्या पाठीवर एकमेव राजा, एकमेव महापुरूष होऊन गेला की, त्याने त्या काळात संपूर्ण जे विचार दिले. त्या विचाराच्या आधारावर केवळ आपला देश नाही तर इतरही अनेक देश चालले आहेत. सर्वधर्माच्या भूमिकेतून प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना एकत्र केलं. एकता हा त्यामागचा मूळ मंत्र होता.'
हे ही वाचा>> राहुल सोलापूरकरची दिलगिरी पण म्हणाला, 'लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र...'
'महाराजांनी ज्यांनी कधीही स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. देशाताील सर्व लोकांना वेगवेगळ्या लोकांना आपलं कुटुंब समजलं. शिवाजी महाराजांनी तत्वाशी कधी त्यांनी तडजोड केली नाही. असं असताना त्यांच्याबद्दल गलिच्छ विधानं केली जातात. केवळ मलाच नाही तर संपूर्ण शिवभक्तांना वेदना होतात की, का त्यांनी असं विधान केलं?'










