RBI: देशात पुन्हा नोटाबंदी… 2 हजारांच्या नोटा बंद होणार!, मोदी सरकारचा मोठा निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोटेचं लीगल टेंडर तर राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोटेचं लीगल टेंडर तर राहील, परंतु ती चलनातून बाहेर काढली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ प्रभावाने जारी करणं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. त्याच 2000 रुपयांची नोटही आता जवळजवळ बंद होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटाही बाहेर येत नसल्याचे लोकांनी सांगितले. यासंदर्भात सरकारने संसदेतही माहिती दिली होती.
एकावेळी 2000 रुपयांच्या किती नोटा बदलून मिळणार?
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा एका वेळी इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये आहे. म्हणजे तुम्ही एका वेली 2000 रुपयांच्या 10 नोटाच बदलून घेऊ शकतात.
2016 साली मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. पण गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममधून देखील 2000 रुपयांच्या नोटाही येत नसल्याचे अनेकांनी सांगितले होते. या संदर्भात सरकारने संसदेत माहितीही दिली होती.










