Guardian Minister: अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

revised list of guardian ministers of 12 districts of maharashtra dcm ajit pawar has got the post of guardian minister of Pune from bjp
revised list of guardian ministers of 12 districts of maharashtra dcm ajit pawar has got the post of guardian minister of Pune from bjp
social share
google news

Ajit Pawar Pune Guardian Minister: मुंबई: राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची (Guardian Minister) सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Pune Guardian Minister) देण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यासाठी अजित पवार हे अत्यंत आग्रही होते ते त्यांनी भाजपकडून (BJP) मिळवलं आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद हे भाजपमधील हेवीवेट नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे होतं. मात्र, ते काढून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलं आहे. (revised list of guardian ministers of 12 districts of maharashtra dcm ajit pawar has got the post of guardian minister of Pune from bjp)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (3 सप्टेंबर) अचानक दिल्ली दौरा करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. ज्यानंतर आज (4 सप्टेंबर) तात्काळ नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली.

हे ही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब

एकीकडे शिंदे-फडणवीस दिल्लीला गेलेले असताना दुसरीकडे अजित पवार हे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मागील अनेक दिवसांपासून अजित पवार हे पुणे, सातारा आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. अखेर काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर पुण्याचं पालकमंत्री पद हे अजित पवारांना देण्यात आलं आहे. मात्र, सातारा आणि रायगड हे अद्यापही शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडेच कायम ठेवण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याचाच अर्थ भाजपने अजित पवारांचा हट्ट पुरवताना चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट करत त्यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदावर बोळवण केली आहे. यामुळे अजित पवारांपुढे भाजप नमल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र, शिंदे गट अद्यापही पालकमंत्री पदांबाबत आक्रमक असल्याचं दिसून येत आहे.

हे ही वाचा >> India Today conclave mumbai : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार? फडणवीसांचं थेट उत्तर; म्हणाले…

आता या नव्या घडामोडीमुळे शिवसेना आणि भाजपच्या मंत्री आणि नेत्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी:

  1. पुणे- अजित पवार
  2. अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
  3. सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
  4. अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
  5. भंडारा- विजयकुमार गावित
  6. बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
  7. कोल्हापूर- हसन मुश्रीफ
  8. गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
  9. बीड- धनंजय मुंडे
  10. परभणी- संजय बनसोडे
  11. नंदूरबार- अनिल भा. पाटील
  12. वर्धा – सुधीर मुनगंटीवार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT