Rohini Khadse: शरद पवारांनी प्रचंड मोठी जबाबदारी दिलेल्या रोहिणी खडसे आहेत तरी कोण?

मुंबई तक

Rohini Khadase : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे. आज हे नाव चर्चेत आलं असलं तरी याआधी त्यांनी पक्षवाढीसाठी केलेलं कामाची दखलही राष्ट्रवादीनं घेतली आहे.

ADVERTISEMENT

rohini khadse appointed nationalist congress party women aghadi state president
rohini khadse appointed nationalist congress party women aghadi state president
social share
google news

Rohini Khadse : राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहिणी खडसे (Rohini khadase) यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदी ज्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती झाली आहे, त्या नेमक्या कोण आहेत. हे आता जाणून घेऊया. शरद पवारांनी महाराष्ट्रात एवढी मोठी जबाबदारी रोहिणी खडसे यांच्यावरच का सोपवली आहे हेही या निमित्ताने आता जाणून घेऊया. (rohini khadse appointed nationalist congress party women aghadi state president)

उच्च शिक्षित रोहिणी खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी ॲड. रोहिणी खडसे यांना 29 रोजी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात नियु्क्तीचे पत्र देण्यात आले आहे. ॲड. रोहिणी खडसे या माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्या उच्च शिक्षित असून त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. तर त्यांचे पदव्युत्तर वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी, तर पुणे विद्यापीठातून एलएलएम पर्यंत झालेले आहे.

हे ही वाचा >> Sunil Raut : ‘आजही मला 100 कोटींची ऑफर, पण…’; सुनील राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट

अल्पशा मतांनी पराभव

अड. रोहिणी खडसे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी आमदार खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

जळगाव जिल्हा बँकेत मोलाचं काम

राजकारणाबरोबर त्या सामाजिक, सांस्कृति, शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान संचालिका आहेत. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा मध्य बँक ऑडिट मध्ये ” ड” दर्जा वरून” अ” दर्जामध्ये आली होती. त्यांच्या कार्यकाळात बँकेचे संगणकीकरण, एटीएम , सीबीएस प्रणाली सेवा सुरू झाली होती तसेच बँकेच्या ठेवीमध्ये आणि भाग भांडवलामध्येही वाढ झाली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp