Sambhaji Bhide: संभाजी भिंडेंना फाशी देणार का? काँग्रेस नेत्याचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संभाजी भिंडेंना फाशी देणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्याच्या या विधानाचा राजकीय वर्तुळात निषेध व्यक्त करण्यात येत असून भिंडे यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरतेय. त्यात आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संभाजी भिंडेंना फाशी देणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (sambhaji bhide controversial statement on mahatma gandi congress leader nana patole question to devedndra fadnavis )
ADVERTISEMENT
नाना पटोले नागपूरात बोलत होते. यावेळी त्यांनी संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केले आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ”अशा लोकांच्या मुसक्या बांधायचा नाहीत, तर अशा लोकांना फाशी द्यायची’ असे विधान केले होते. आता संभाजी भिडेला फाशी देणार का? असा सवाल नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. तसेच भाजपने सत्तेच्या माध्यमातून जसे मणिपूर पेटवलं, तसं संभाजी भिडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? असा सवाल देखील पटोले यांनी केला.
हे ही वाचा : मुंबई TAK चावडी: अजित पवारांनी बंड का केलं? धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
ही पहिली घटना नाही आहे, संभाजी भिडे यांनी अनेकदा अशी वक्तव्ये केली आहेत, पण सरकार त्यांना पाठीशी घालतेय असा आरोप नाना पटोले यांनी केला. भाजप सत्तेत असताना भीमा कोरेगावची घटना घडली होती. भीमा कोरेगाव प्रकरणांमध्ये संभाजी भिडेचे प्रमुख होते, पण निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल आहेत. पण संभाजी भिडे मात्र मोकळे आहेत असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
सत्ताधाऱ्यांनी जाहीर करून टाकाव की भिडेंच्या पाठीमागे भाजप आहे. महाराष्ट्रातील लोकांना काय मेसेज द्यायचा आहे,ते काँग्रेसच्या माध्यमातून ठरवलं जाईल.पण जो पर्यंत हा लपाछपीचा खेळ संभाजी भिडे यांच्या माध्यमातून भाजप खेळते आहे, तो एकदा स्पष्ट झाला पाहिजे ही भूमिका आमची आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
मणिपूरमध्ये भाजपचे सरकार आहे, महाराष्ट्रातही भाजपप्रणित सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का?, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. येत्या दोन दिवसात भिडेंवर कारवाई झाली नाही तर बुधवारी अधिवेशन सुरू होईल त्या दिवशी काँग्रेसच्या वतीने ही भूमिका मांडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sharad Pawar-Ajit Pawar एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या भेटीने काय दिले संकेत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT