One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’
One Nation, One Election : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी वन नेशन, वन इलेक्शन मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला आहे.
ADVERTISEMENT

Sanjay Raut on One Nation One Election : ‘इंडिया’ आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वन नेशन, वन इलेक्शन घेण्यासाठी सरकारने पहिले पाऊल टाकलं असून, समितीही स्थापन केली आहे. यावरून शिवसेनेचे (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मोदी सरकारने एक नवा फुगा हवेत सोडला आहे, वन नेशन वन इलेक्शन. त्याच्या आधी एक संविधान, एक विधान वगैरे… काय झालं जम्मू काश्मीरला? तिथे आधी इलेक्शन घ्या. मणिपूरमध्ये घ्या. वन नेशन, वन इलेक्शन आधी या देशात निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका व्हायला हव्यात.”
“भ्रष्ट निवडणूक आयोग या देशात काम करतोय. तो दूर केला पाहिजे. दबावाखाली काम करणारा भ्रष्ट निवडणूक आयोग जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात पारदर्शी निवडणुका होणार नाही. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन राजकीय फंडे आहेत”, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा >> केंद्रीय मंत्र्याच्याच घरात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, नेमकं काय घडलं?
“वन नेशन, वन इलेक्शन’, हे काय आहे? देश तर एकच आहे ना? कुणाच्या मनात शंका आहे का? या देशात जर कुणी वेगळ्या गोष्टी करतात. तसं तर एक देश एक संविधान असंही आपण म्हणतो. एक देश एक निवडणूक ठिक आहे, पण निष्पक्ष निवडणुका घ्या, अशी आमची मागणी आहे. कारण या देशात ते होत नाहीये”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.