संजय राऊत राष्ट्रवादी प्रवेश करणार? नितेश राणेंनी तारीखही सांगितली

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut join ncp bjp nitesh rane also declare
sanjay raut join ncp bjp nitesh rane also declare
social share
google news

Sanjay Raut join NCP?: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून एकामागोमाग एक राजकीय भूकंप होत आहे. नुकताच शरद पवार (Sharad pawar) यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होऊन मोठा राजकीय भूकंप केला होता. मात्र यानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेऊन अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. या राजकीय भूकंपातून महाराष्ट्र सावरत असतानाच आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीण एक राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (sanjay raut join ncp bjp nitesh rane also declare date also)

ADVERTISEMENT

संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

नितेश राणे (Nitesh Rane) यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीण एक राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे वक्तव्य करत संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. संजय राजाराम राऊत हा येणाऱ्या 10 जून या राष्ट्रवादीच्या वर्धापण दिनाच्या अगोदर अथवा त्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केलाय. संजय राऊतांच्या या संदर्भात बैठका झाल्यात, बोलणीही सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली असल्याचेही नितेश राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा :  “बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती”

राष्ट्रवादी प्रवेशाची अट सांगितली…

शरद पवार (Sharad pawar) यांच्या राजीनाम्यानिमित्त संजत राऊतांची भूमिका बघितली तर, ते सातत्याने अजित दादांच्या विरोधात बोलत आहेत. अजित दादांवर टीका करत होते. या मागचे कारण म्हणजे, राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाची त्यांची अटच तशी आहे.अजित दादांनी पक्ष सोडला, तर मी पक्षप्रवेश लगेच करतो, अशी राऊताची भूमिका असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. त्यामुळे सातत्याने अजित दादांच्या विरोधात भूमिका घेणे, त्यांच्या विरोधात बोलणे, टीका करणे. हे महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव जो करतोय, त्याचे नाव संजय राऊत, असे देखील नितेश राणे म्हणाले.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंसोबत रस नाही

उद्धव ठाकरेंचे काही खरं नाही, त्यांचा स्वत:चा पक्षच राहिला नाही.मला काय उद्धव ठाकरे सारखं खासदार बनवू शकत नाही.त्यामुळे मला (संजय राऊतला) उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा रस राहिला नाही.म्हणून माझा राष्ट्रवादी प्रवेश तुम्ही घ्या, असे राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला. आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगतोय. हा साप आहे. तुम्ही सापाला दुध पाजताय, हा ना बाळासाहेबांचा होऊ शकला, ना तुमच्या उद्धव ठाकरेंचा होणार आहे. याने बाळासाहेबांच्या वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडण लावली. तेच आता उद्धव ठाकरेंच्या घरात करतोय,अशी टीका नितेश राणे यांनी केली. तसेच संजय राऊत जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश करेल तेव्हा याचे खरे मनसूबे उद्धव ठाकरेंना कळतील,असे देखील नितेश राणे म्हणाला.

हे ही वाचा : शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते -जयंत पाटील

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी संजय राऊतला व्यायपीठावर बसायचं होतं. सकाळपासून पवार साहेबांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करत होता,पण पवार साहेब येत नव्हते.
तसेच उद्धव ठाकरेंना एकट पाडण्याचा प्रयत्न संजय राऊताचा आहे? त्यांची भेट का होऊ दिली नाही. स्वत: चार-चार वेळा जातात, पण त्यांची काय भेट व्हायला देत नाही, असा सवाल देखील नितेश राणे यांनी केला.

ADVERTISEMENT

दरम्यान संजय राऊत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला होता.यावर अजित पवार यांनी, मला त्याच्याबद्दल काही माहित नसल्याची प्रतिक्रिया दिली. एकंदरीत अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT