Sanjay Raut : ‘यालाच म्हणतात आ बैल…’ , बावनकुळेंच्या फोटोवरून राऊत पुन्हा भिडले, नव्या ट्वीटमध्ये काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sanjay raut new tweet chandrashekhar bawankule casino photo macau maharashtra politics
sanjay raut new tweet chandrashekhar bawankule casino photo macau maharashtra politics
social share
google news

Sanjay Raut new Tweet Criticize Bjp : ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मकाऊतल्या कॅसिनोतला फोटो (Casino Photo) शेअऱ करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. या फोटोंना प्रत्युत्तर देताना भाजपच नेत्याच नाव सांगून बसली होती. त्यामुळे भाजप चांगलीच बुचकळ्यात पडली. या सर्व घडामोडींवर सोमवारी दिवसभर राजकारण पेटले होते. असे असताना आता संजय राऊतांनी (Sanjay Raut)  आज पुन्हा ट्वीट करून भाजपला डिवचलं आहे. (sanjay raut new tweet chandrashekhar bawankule casino photo macau maharashtra politics)

संजय राऊतांनी सोमवारी शेअर केलेल्या मकाऊतल्या कॅसिनोतला फोटोमध्ये संबंधित नेत्याचे नाव टाळले होते. तसेच संबंधित व्यक्तीने 3.50 कोटी रूपये जुगारात उडवल्याचेही सांगितले होते. या आरोपांना उत्तर देताना भाजपचं संबंधित नेत्याचे नाव सांगुन बसली होती. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले होते. यानंतर स्वत: चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमध्ये गेल्याचे कबूल करत यावर खुलासा केला होता.

हे ही वाचा : टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र… अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सर्व घडामोडीवर आता पुन्हा संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये पुन्हा त्यांनी बावनकुळेचं नाव टाळत भाजपवर टीका केली आहे. मी माझ्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले किंवा आरोप केले? नाही! मी माझ्या साध्या ट्विटमध्ये एवढेच म्हटले आहे की ‘काही निरो मकाऊ (चीन) मध्ये जुगार खेळण्यात व्यस्त आहे. कारण महाराष्ट्र जळत आहे…’. पण फोटोतील व्यक्ती ‘त्यांचा’ प्रदेशाध्यक्ष असल्याचे सांगून भाजपने हिट विकेट फेकल्याचा टीका राऊत यांनी केली. तसेच यालाच हिंदीत म्हणतात – ‘आ बैल, मुझे मार’, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.

भाजप-ठाकरे गटात ट्वीटरवॉर

संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक फोटो ट्वीट केला होता. हा फोटो मकाऊतील कसीनोचा होता. या फोटोच्या कॅप्शनला, ‘महाराष्ट्र पेटलेला आहे…आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…, असे लिहून संजय राऊतांनी सस्पेन्स कायम ठेवला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ind vs Aus : टीम इंडिया खचली, PM मोदी गेले थेट ड्रेसिंगमध्ये; मॅचनंतर काय घडलं?

या ट्विटच्या लगोलग राऊतांनी आणखीण एक ट्वीट केले. ज्यामध्ये राऊतांनी मुक्काम पोस्ट मकाऊ असे लिहत कसीनोचा पत्ताच सांगितला. आणि कसीनोत संबधित व्यक्तीने 3.50 कोटी रूपये जुगारात उडवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगितल्याचे राऊतांनी म्हटले. तसेच पुढे राऊतांनी हिंदुत्ववादी महाशय असल्याची ओळख सांगत सस्पेंन्स आणखीणच वाढवला. आणि खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असे म्हणत राऊतांनी भाजपला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, संजय राऊतांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये संबंधित नेत्याचे नाव कुठेच घेतले नव्हते. फक्त हे ट्वीट भाजपला टॅग करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

भाजनकडूनच नेत्याच नावच जाहिर

राऊतांनी टाकलेल्या या आरोपांच्या जाळ्यात उत्तर देताना मात्र भाजप फसली आणि नेत्याची नावच जाहीर करून मोकळी झाली. भाजपने राऊतांना ट्वीट करून उत्तर देताना ट्वीटमध्ये म्हटले की,आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते तिथला हा परिसर असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही, असा प्रतिहल्लाही भाजपाने राऊतांवर केला. तसेच आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणती विस्की आहे? असा सवाल भाजपाने राऊतांना करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.

फॅमिली चिनी आहे का?

भाजपने दिलेल्या उत्तरावर आता राऊतांनी पुन्हा हल्ला चढवला आहे. राऊतांनी ट्वीट करत म्हटलं की, तर म्हणे..फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची फॅमिली चिनी आहे का? असा सवाल राऊत यांनी भाजपला पुन्हा घेरलं. आणि जर कधीच जुगार खेळले नाहीत..मग टेबलावर काय मारुती स्तोत्र आहे का? असा रोखठोक सवालचं केला. झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, असे म्हणत राऊंतानी भाजपला थेट इशाराच दिला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवच फोटो पोस्ट केला आहे. पूर्ण फोटोत हे स्पष्टपणे लक्षात येंत की, तेथे बावनकुळे,त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, नातू असं सगळं कुटुंब आहे. त्यामुळे ही विकृती मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे. इतकी निराशा योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या फोटोवर दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT