Sanjay Raut : ‘अजित पवारांचे सोम्या-गोम्या दिल्लीत’, राऊत भिडले, केला पलटवार
Sanjay Raut-Ajit Pawar : अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. सोम्या-गोम्या म्हणत अजित पवारांनी डिवचल्यानंतर राऊतांनीही समाचार घेतला.
ADVERTISEMENT
Sanjay Raut Ajit Pawar Maharashtra politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. ‘आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल, तर तुम्हीच पडाल, असं म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवार सोम्या-गोम्या म्हणाले. या विधानानंतर संजय राऊत अजित पवारांना भिडले. सोम्या-गोम्याचा उल्लेख करत राऊतांनी पलटवार केला.
ADVERTISEMENT
‘मी सोम्या-गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही’, असे म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांचा समाचार घेतला. अजित पवारांच्या या विधानाला संजय राऊतांनी त्याच शब्दात उत्तर दिले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
“२०२४ ला कळेल सोम्या-गोम्या”
अजित पवारांच्या ‘सोम्या-गोम्या’ला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत. बरं का… ज्यांनी गुलामी पत्करली आहे. जे डरपोक आहेत, त्यांनी आमच्यावर बोलूच नये. याच्यापेक्षा जास्त बोलण्याची मला गरज नाही. सोम्या गोम्या कोण आहेत २०२४ ला कळेल, हे मी वारंवार सांगतोय.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> जयंत पाटलांचा प्रश्न विचारताच संजय राऊत म्हणाले, ‘मर्द लोक…’
“या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचा रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना, सध्याच्या सरकारमधील हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत”, अशा शब्दात राऊतांनी अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नामर्द
राऊत पुढे म्हणाले, “त्यांना आमच्यावरच काय, इतर कुणावरही बोलण्याचा अधिकार नाही. इतकं नामर्द सरकार आणि इतके नामर्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या इतिहासात झाले नसतील.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> महाविकास आघाडीचं जागा वाटप ‘या’ निकषावर ठरणार!
“डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय. डोळ्यासमोर मुंबई तोडली जातेय. डोळ्यासमोर मुंबईतील उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा फक्त तुरुंगात जाऊ या भयाने जे लटपटताहेत, ते काय आमच्यावर बोलणार? त्यांनी बोलूच नये”, असे खडेबोल संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT