Sanjay Raut: "लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा...", अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून राऊत कडाडले

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

Sanjay Raut On Amit Shah
Sanjay Raut On Amit Shah
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापलं

point

संजय राऊतांनी अमित शहांवर डागली तोफ

point

अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतायत, पण...

Sanjay Raut On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असून लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असल्याचं समोर आलंय. शाहांच्या मुंबई दौऱ्यापूर्वीच संजय राऊतांनी मोठं विधान केलं आहे. "लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. त्यांना येऊद्या. पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या, त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना..हेही होऊ शकतं. हे काहीही करू शकतात, लालबागचा राजा प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात म्हणून गुजरातला घेऊन जाऊ शकतात. लालबागचा राजा गुजरातला नेण्याचा प्रस्ताव हे देऊ शकतात. हे व्यापारी लोक आहेत, हे स्वतःला महाराष्ट्राचे दुश्मन मानतात", असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शाहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Union Home Minister Amit Shah will be visiting Mumbai and will be taking darshan of Lalbaugcha Raja)

अमित शाहा कमजोर गृहमंत्री

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्याची परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, अमित शहा यांना आमचा विरोध यासाठीच आहे की महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीने दळबद्रीच राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार,उद्योग,रोजगार अनेक महत्त्वाच्या आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत पण कमजोर गृहमंत्री आहेत, या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.

हे ही वाचा >> Mahesh Landage: भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, यामागचं कारण काय?

"महाराष्ट्राची जनता त्यांना शत्रू मानते"

राऊत पुढे म्हणाले, जम्मू-काश्मीर,मणिपूर आणि इतर भागातील कायदा सुव्यवस्थेकडे यांचं अजिबात लक्ष राहिलेलं नाही. राजकारण,पक्षफोडी, लुटमार याला पाठिंबा देणं, मुंबई लुटणे, लुटणाऱ्यांना पाठिंबा देण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखं महाराष्ट्रातलं स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अतिकमजोर करणे, अशा प्रकारची कामं त्यांनी केली. हे गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बल करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात. मुंबईत येत असतात. महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असे अनेक राज्य आहेत जे भाजप लुटू पाहते, अमित शहा यांचा गृहमंत्री म्हणून काम आहे की सर्वांना समान न्याय द्यावा, त्यांचं काम पक्ष फोडणं नाही पण हेच काम गृहमंत्री करत आहेत त्यामुळे इतिहासात याची नोंद राहील की अशा प्रकारचा गृहमंत्री देशाला लाभला. त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे, महाराष्ट्र तोडायचा आहे, महाराष्ट्र कमजोर करायचा आहे,महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खूपतोय.  

हे ही वाचा >> Lucknow Building Collapse: बघता बघता इमारत पत्त्यांसारखी कोसळली! 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

ज्या पद्धतीचे लोकसभेचे निकाल महाराष्ट्राने दिलेले आहेत, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा आहे. म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीत, हिम्मत असेल तर हरियाणा सोबत निवडणूक घ्या.  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका का घेत नाहीत, अमित शहा तुम्ही मुंबईत येत आहात.कुठेही निवडणूक घेतल्या नाहीत हाच सर्वात मोठा तुमचा घोटाळा आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT