संजय राऊतांचा फडणवीस, शेलारांना ‘जालीम डोस’! दाखवला वाजपेयी-आडवाणींचा व्हिडीओ
पुन्हा एकदा बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद शिलगला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जाताहेत. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बाबरी मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानांचे व्हिडीओ आहेत.
ADVERTISEMENT
Babri Masjid Demolition Ram Mandir Shiv sena bjp Politics : राम मंदिरात मूर्तींची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद शिलगला आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जाताहेत. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेचा दाखला ठाकरेंच्या सेनेकडून दिला जातो. तर भाजपकडून बाबरी मशीद पाडण्याचे श्रेय घेतले जात आहेत. यावरून शिलगलेला वाद नव्या वळणावर आला आहे. (Sanjay Raut reply to devendra fadnavis, ashish shelar, girish mahajan. raut shares video of atal bihari vajpayee and lal krishna advani statements after babri masjid demolition)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी केलेल्या विधानांना आणि मांडलेल्या भूमिकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बाबरी मशीद पाडल्यानंतर लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या विधानांचे व्हिडीओ आहेत.
फडणवीस, महाजन, शेलार काय बोललेत?
संजय राऊत यांनी भाजपच्या तिन्ही नेत्यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची विधान व्हिडीओतून दाखवली आहेत. ते बघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि आशिष शेलार नेमकं काय म्हणाले, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
हे वाचलं का?
फडणवीस म्हणाले आहेत की, “मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती, तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. मी त्यांच्यावर काय बोलायचं? आम्ही कारसेवक आहोत आणि त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. मी बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. जेव्हा कलंकित ढाचा पाडला गेला, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. मी त्यांच्याविषयी कशाला बोलायचं?”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.
हेही वाचा >> कोल्हापुरात पाटील-महाडिक वाद पेटणार! साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना बेदम मारहाण
उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना आशिष शेलार म्हणालेले की,”संजय राऊतांचा राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंध नाही. उद्धव ठाकरे त्या आंदोलनात नव्हते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे. ज्या कोठारी बंधूंनी, कारसेवकांनी स्वतःचं बलिदान दिलं, त्यांचा खून मुलायमसिंगच्या समाजवादी पक्षाने केला. त्या समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंग यांच्याशी हातमिळवणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केली. त्यामुळे रामसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगले आहेत, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे उद्धवजींच्या कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागलं आहे”, असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> दक्षिणेचा किल्ला भेदण्यासाठी मोदी मैदानात, भाजपचं ‘मिशन साऊथ’ काय?
उद्धव ठाकरेंना राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेचं निमंत्रण न देण्याच्या मुद्द्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणालेले, “राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रण न मिळाल्याचे उद्धव ठाकरे यांना वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. राम मंदिर आंदोलनाचे मी स्वत: साक्षीदार आहोत. दोनवेळा मी कारसेवेत सहभागी झालो होतो. 20 दिवस तुरुंगात होतो. उद्धव ठाकरे हे तेव्हा घरात बसले होते. ते कधीही अयोध्येत आले नाहीत. त्यांचा आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही. राम मंदिर उभारणीत त्यांचे योगदान काय? त्यामुळे बोलावले काय आणि नाही बोलावले काय, त्यांना इतके वाईट वाटण्याचे कुठलेही कारण नाही”, अशी टीका गिरीश महाजनांनी केली होती.
ADVERTISEMENT
संजय राऊत म्हणाले, “तथाकथित राम भक्तांसाठी स्मरण गोळी”
फडणवीस, महाजन आणि शेलार यांचा उल्लेख करत संजय राऊतांनी उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे… तथाकथित राम भक्तांसाठी ‘ही’ स्मरण गोळी” Memory tablets. उगाळून घ्या… आणखी देखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी देऊच”, असे म्हणत संजय राऊतांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
अयोध्येत 6 डिसेंबरला जे घडलं ते खूप दुर्दैवी -वाजपेयी
वाजपेयींनी अयोध्येत घडलेल्या घटनेनंतर दिलेल्या मुलाखातील एक अंश आहे. त्यात ते म्हणतात, “अयोध्येमध्ये 6 डिसेंबर रोजी जे घडले, ते खूप दुर्दैवी आहे. हे असं घडायला नको होतं. हे घडू नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले, पण आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. आम्ही त्याबद्दल माफी मागतो. कारसेवक नियंत्रणाबाहेर गेले होते. त्यांनी जे केले, ते घडायला नको होतं”, असं अटल बिहारी वाजपेयी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर म्हणाले होते.
हेही वाचा >> “शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, भुजबळ सुपारी घेतलेला पोपट”
महाराष्ट्रातील..
श्रीमान फडणवीस
श्रीमान गिरीश महाजन
श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे… तथाकथित राम भक्तांसाठी.. ही’ स्मरण गोळी”
Memory tablets..
उगाळून घ्या..
आणखी देखील जालीम डोस आहेतं.. योग्य वेळी देऊच..@AUThackeray@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @girishdmahajan@ShelarAshish pic.twitter.com/J5ZgUqHBmR— Sanjay Raut (@rautsanjay61) January 3, 2024
बाबरी मशीद विध्वंसानंतर लालकृष्ण आडवाणींनी काय भूमिका मांडली होती, त्याचाही अंश या व्हिडीओत आहे. आडवाणी त्यावेळी म्हणालेले की, “माझ्या आयुष्यातील सगळ्या वाईट दिवस असं मी त्या दिवसांचं वर्णन केलेलं आहे. ती खूप भयंकर चूक होती, याबद्दल कोणताही शंका नाही. खरंतर मी पहिल्यांदा उमाला (उमा भारती) सांगितलं की वर जा आणि त्यांना खाली ढकल. असं करू नका असं त्यांना सांग. नंतर ती आली आणि मला म्हणाली की, वर जे लोक आहेत, ते मराठी भाषिक आहेत. ते माझं ऐकत नाहीयेत. मग मी प्रमोदला (प्रमोद महाजन) सांगितलं. प्रमोद तिथं गेला, तोही परत आला. तो निराश होता. मला आठवत की, आरएसएसचे नेते रज्जू भैय्या, ते तिथे नव्हते. पण, त्यांचं विधान आहे की, मशीद पाडल्याचा मी निषेध करतो आणि त्यांच्याशी सहमत आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT