संजय राऊतांकडून तोंडभरून कौतूक, पण अजित पवारांनी ‘तो’ उल्लेखही टाळला
संजय राऊतांनी मविआ सभेत अजित पवारांचं तोंडभरून कौतूक केलं. पण दादांनी मात्र राऊतांना कट मारत आपलं भाषण केलं. महाविकास आघाडीच्या मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत नेमकं काय झालं?
ADVERTISEMENT
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा झाली. या सभेतून तिन्ही पक्षातील नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांवर टीका करण्यात आली. त्याचवेळी संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात एक किस्साही घडला. या सभेत खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचं तोंडभरून कौतूक केलं, पण अजित पवारांनी पूर्ण भाषणात संजय राऊतांचा उल्लेखही केला नाही.
ADVERTISEMENT
संजय राऊतांनी मविआ सभेत अजित पवारांचं तोंडभरून कौतूक केलं. पण दादांनी मात्र राऊतांना कट मारत आपलं भाषण केलं. महाविकास आघाडीच्या मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेत नेमकं काय झालं?
महाविकास आघाडीची पंधरा दिवसांपूर्वी नागपुरात दुसरी सभा झाली. आणि याच सभेपासून अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये वादाची ठिणगी पडली. पवारांनी तर भर पत्रकार परिषदेतच कोण संजय राऊत असं म्हणत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. दुसरीकडे संजय राऊत काहीशा सबुरीच्या भुमिकेत दिसले. राऊतांची ही स्ट्रॅटेजी सोमवारी १ मेला मुंबईतल्या सभेतही दिसली. बंडाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी अजित पवारांचं नाव घेत कौतूक केलं. सगळ्यांना दादांची कशासाठी प्रतिक्षा आहे, हेही सांगितलं. राऊत नेमकं काय म्हणाले, ते तुम्हीच बघा.
हे वाचलं का?
अजित पवारांबद्दल संजय राऊत वज्रमूठ सभेत काय बोलले?
“दादा, सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. सकाळपासून एकच दादा येणार ना? दादा येणार ना? आम्ही म्हणतोय दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार”, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांनंतर मविआच्या सभेत उद्धव ठाकरेंआधी अजित पवारांचं भाषण झालं. पण अजित पवारांनी 17 मिनिटांच्या भाषणात राऊतांचा साधा नामोल्लेखही केला नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यावरही अजित पवारांनी भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मुंबई वज्रमूठ सभा : “मोदीजी, तुमच्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बूच घाला, अन्यथा…”, ठाकरे कडाडले
अजित पवार म्हणाले, “आपल्यामध्ये जाणीवपूर्वक काही बातम्या पसरवल्या जात आहेत. अलीकडेच्या काळात न विचारताच बातम्या काहींना काही देत असतात. त्यामुळे कारण नसताना कार्यकर्ते आणि सर्वसामान्य संभ्रमावस्थेत राहते, त्या गोष्टीवरही विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही, अशा प्रकारची विनंती सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सहकारी मित्रांना करतो”, असं सांगत अजित पवारांनी गेल्या महिन्यात समोर आलेल्या बातम्यांवर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मुंबई हादरली! दिवसाढवळ्या गोळ्या झाडून महिलेची हत्या
अजित पवारांनी वक्त्यांच्या नामावलीतही राऊतांच्या नावाचा उल्लेख केला नाही. सुभाष देसाईंचं नाव घेतलं, पण दादांनी राऊतांच्या नावाला कट मारली. यावरूनच अजित पवारांची राऊतांवरील नाराजी अजून दूर झाली नसल्याचं म्हटलं जातंय. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांकडून हा नामोल्लेख नजरचुकीने राहिला की जाणूनबुजून करण्यात आला नाही, याची आता चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT