Sanjay Raut : "फडणवीस व सोमय्यांना कोणत्या चौकात चाबकाने मारायचे?", राऊतांचा हल्ला
Sanjay Raut Rokhthok : अशोक चव्हाणांच्या भाजपतील प्रवेशानंतर संजय राऊत यांचे रोखठोकमधून भाजपवर टीकास्त्र
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून भाजपवर हल्ला

देवेंद्र फडणवीसांना राऊत म्हणाले, 'वाटाणा'

मोदी-शाहांवर राऊतांची घणाघाती टीका
Sanjay Raut Ashok Chavan Devendra Fadnavis : अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपने त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेवर पाठवले. याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी रोखठोकमध्ये भाजपला रोकडा सवाल केला आहे. देवेंद्र फडणवीसांना वाटाणा म्हणत राऊतांनी टीकेचे बाण डागले.
'राम लहर संपली! आता राम नाम सत्य है!', या रोखठोक लेखात राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. "आडवाणींपासून महाराष्ट्रात माधव भंडारींपर्यंत भाजपची जुनी माणसे अडगळीत गेली व काल आलेल्या अशोक चव्हाणांना शुद्ध करून राज्यसभेवर घेतले. ‘राम लहर’ ओसरल्याचा हा सर्वात मोठा पुरावा", असं म्हणत राऊतांनी मोदी-शाहांबरोबरच देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं.
संजय राऊतांचे भाजपवर वाक्'बाण', काय म्हटलंय?
खासदार संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, "संसदेत अमित शहा यांनी 'आदर्श' घोटाळ्यावर गुळण्या टाकल्या. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: नांदेडला येऊन 'आदर्श'मधील घोटाळ्याने कारगिलमधील शहिदांचा कसा अपमान झाला यावर प्रवचन झोडले. शहिदांचा हा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे जाहीर केले."
"देवेंद्र फडणवीस या 'आदर्श' भ्रष्टाचारावर तापलेल्या तव्यावरील वाटाण्यासारखे ताडताड उडताना महाराष्ट्राने पाहिले. हा वाटाणा आता शांत झाला. देवेंद्र फडणवीस यांनीच अशोक चव्हाण यांचा प्रवेश भाजपात करून घेतला", असं म्हणत राऊतांनी भाजपच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना सुनावलं.