Savarkar Row : शरद पवारांची मध्यस्थी! राऊतांची राहुल गांधींसोबत चर्चा, काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

savarkar row Sharad pawar advice to rahul gandhi says avoid talk on veer savarkar issue
savarkar row Sharad pawar advice to rahul gandhi says avoid talk on veer savarkar issue
social share
google news

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांचं नाव घेत केलेल्या विधानाचे राज्यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे राज्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेने थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तर उद्धव ठाकरेंची कोंडी झाल्याचं स्थिती निर्माण झाली. यातून महाविकास आघाडीचाही प्रश्न समोर आला, मात्र शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर हा मुद्दा निकाली निघाल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल गांधींच्या विधानानंतर मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. सावरकर आमचे दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीही बोलले आम्ही सहन करणार नाही, अशा आशयाची भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षातील वैचारिक भेदांची चर्चा सुरू झाली होती.

व्हिडीओ बघा – रणजीत सावरकर शरद पवार, ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले?

दरम्यान, दिल्लीत विरोधी पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मुद्दा मांडला होता. “सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकर माफीवीर म्हणणं योग्य नाही. ते एक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक होते, हे मान्य केलं पाहिजे. त्यांची इतर सामाजिक अंगे समजून घेतली पाहिजे”, असं शरद पवार या बैठकीत म्हणाले होते. शरद पवारांनी राहुल गांधींना सावरकरांबद्दल न बोलण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा दिला होता.

संजय राऊत यांची राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत चर्चा

खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींच्या चर्चेबद्दल संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचे सगळे खासदार एकत्र बसलो. या बैठका नेहमी होत असतात. नेहमीप्रमाणे आमच्या घरी होतात. राहुल गांधींसोबत माझं बोलणं झालेलं आहे. काँग्रेस अध्यक्षांसोबतही माझं बोलणं झालेलं आहे. त्या विषयावर मी आता बोलत नाही. उद्या बोलेन. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आमचं काल आणि आज बोलणं झालेलं आहे. मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी झालेल्या बैठकीत शरद पवारांपासून जवळजवळ सर्व विरोधी पक्षांनी ही भूमिका घेतली की, सावरकरांचा मुद्दा काढण्याची गरज नाही.”

महाविकास आघाडी कायम राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. त्यांनी वारंवार भूमिका मांडलेली आहे. महाविकास आघाडी व्हावी म्हणून काँग्रेसला तयार करण्यातही शरद पवारांची भूमिका महत्त्वाची राहिलेली. त्यामुळे सावरकर मुद्द्यांवरून ठाकरेंची कोंडी झाल्यानंतर शरद पवारांनी थेट राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगेशी चर्चा करून असे वाद टाळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तूर्तास तरी महाविकास आघाडीतील मतभेद मिटल्याचं दिसत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा – Savarkar Row : …तर राहुल गांधी आज कुठे दिसलेही नसते; सावरकरांवरील टीकेवरून शरद पोंक्षे भडकले

 

ADVERTISEMENT

रणजीत सावरकरांना संजय राऊतांचं उत्तर

वि.दा. सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी टीका करताना म्हटलं होतं की, उद्धव ठाकरेंनीही यात्रा काढावी. त्यांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले, “ते ज्या कार्यालयात बसतात, ते सावरकरांचं स्मारक उभं करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांचं मोठं योगदान आहे, हे ते विसलेले दिसतात. मी जनतेला आवाहन करेन की, सावरकर स्मारकात जाऊन त्यांनी भेट दिली पाहिजे. सावरकरांच्या काय स्मृती या विश्वस्ताने जतन केल्या हे पाहिलं पाहिजे. पण, ते स्मारक शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेतून उभं राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT