Nikhil Wagle: पुण्यात तुफान राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांचा निखिल वागळेंवर हल्ला, कारच फोडली!
BJP worker attacked on Nikhil Wagle: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.
ADVERTISEMENT

Nikhil Wagle: पुणे: पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी वागळेंची कारच फोडली. तसंच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील केली. (senior journalist nikhil wagle was attacked by bjp workers in pune his car was smashed)
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. याच विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंच्या कारवर तुफान हल्ला चढवला.
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुण्यात आज (9 फेब्रुवारी) राष्ट्रीय सेवा दलाच्या वतीने 'निर्भय बनो' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी निखिल वागळे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण हा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी पुण्यातील काही भाजप नेत्यांनी दिली होती.
हे ही वाचा>> MOTN: नितीन गडकरी होणार मोदींचे उत्तराधिकारी, पण..
दरम्यान, पुण्यात आज दुपारपासून निखिल वागळेंवर भाजपने जोरदार आंदोलन सुरू होतं. मात्र, संध्याकाळी कार्यक्रमस्थळी निखिल वागळे यांची कार येताच भाजप कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी वागळेंच्या कारवर जोरदार हल्ला केला. एवढंच नव्हे तर शाईफेक देखील करण्यात आली. पुण्यात शास्त्री रोडवर महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते हे प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे जेव्हा वागळेंची गाडी ही दांडेकर पूल चौकामध्ये आली तेव्हा अचानक निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.