Mood of the Nation: Nitin Gadkari होणार मोदींचे उत्तराधिकारी, पण शाह-योगींचा अडथळा?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

नितीन गडकरी होणार पुढचे पंतप्रधान?
नितीन गडकरी होणार पुढचे पंतप्रधान?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोदींचे उत्तराधिकारी कोण होणार?

Mood of the Nation Nitin Gadkari PM candidate: मुंबई: इंडिया टुडे आणि सी व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेमध्ये देशात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील जनतेचा नेमका मूड काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुन्हा एकदा जनता भाजपच्या पारड्यात मत टाकून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची संधी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणजेच भाजपमधून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार हा कळीचा मुद्दा आहे. (mood of the nation 2024 who do you think is best suited to succeed modi as the bjp prime ministerial candidate)

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी हे 2014 पासून पंतप्रधान पदी विराजमान आहेत. आगामी लोकसभेत जर भाजपची सत्ता आली तर मोदी पंतप्रधानाची हॅटट्रिक साधतील. पण  मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत नेहमीच चर्चा असते. त्याचविषयी मूड ऑफ द नेशनमध्ये देशातील जनतेला सवाल विचारण्यात आले. पाहा मोदींचा उत्तराधिकारी म्हणून जनतेने कोणाला पसंती दिलीए. 

यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे.. महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील नितीन गडकरी हे या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

हे वाचलं का?

PM मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शाहांना पसंती... 

2014 साली नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील सत्तेच्या चाव्या आल्यानंतर अमित शाह यांच्या नावाच दबदबा हा वाढत गेला. नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे आणि भाजपचे चाणक्य अशी अमित शाह यांची ओळख आहे.

2014 मध्ये मोदी हे पंतप्रधान पदी आल्यानंतर त्यांनी भाजपची सूत्रं ही अमित शाह यांच्या हाती दिली. यावेळी अमित शाह यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याच नेतृत्वात 2019 सालच्या निवडणुका या भाजपने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने आपला स्वत:चाच रेकॉर्ड मोडीत काढला होता. 

ADVERTISEMENT

याच विजयात अमित शाह यांचा सिंहाचा वाटा होता. कारण त्यांच्याच रणनितीच्या आधारे भाजपने देशात बलाढ्य विजय मिळवलेला. त्याचंच फळ अमित शाह यांना मिळालं. कारण 2019 च्या निवडणुकीनंतर देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शाह यांच्यावर मोदींनी जबाबदारी सोपावली. 

ADVERTISEMENT

तेव्हापासूनच अमित शाह हे भाजपमध्ये अधिकाधिक ताकदवान होत गेले. त्याचीच परिणिती म्हणून देशातील जनतेलाही असं वाटतं की, मोदींचे उत्तराधिकारी आणि भाजपचे पुढील पंतप्रधानाचे उमेदवार हे अमित शाह हेच असावे.

नुकत्याच केलेल्या (फेब्रुवारी 2024) मूड ऑफ द नेशन सर्व्हेत अमित शाह यांना मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून 29 टक्के जनतेने पसंती दिली आहे. जी सर्वाधिक आहे. ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत देखील अमित शाह यांना तवढीच पसंती होती. म्हणजेच यामध्ये सध्या तरी कोणताही बदल झालेला नाही. 

अमित शाहांना टक्कर देणार योगी आदित्यनाथ?

पंतप्रधान मोदींची कट्टर हिंदुत्वावादी अशी प्रतिमा तयार झाली आहे. ज्याचा त्यांना निवडणुकांमध्ये फायदाही होत असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यांच्यासारखीच प्रतिमा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची झाली आहे. त्यामुळेच मूड ऑफ द नेशन सर्व्हेत ते थेट अमित शाह यांना टक्कर देताना दिसत आहेत. 

मोदींचे उत्तराधिकारी कोण असं विचारल्यानंतर अनेक जण आजही योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतात. तेच आपल्याला सर्व्हेमध्ये पाहायला मिळत आहे. कडवट हिंदुत्ववादी म्हणून योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशच्या राजकारणात आपली छाप सोडली आहे. 

सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने ते मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यामुळेच आता मोदींचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. पण त्यासाठी त्यांची प्रामुख्याने अमित शाह यांच्यासोबत स्पर्धा असणार आहे. सर्व्हेनुसार, अमित शाह यांना 29 टक्के पसंती मिळाली आहे. तर योगी आदित्यनाथ यांना 25 टक्के पसंती मिळाली आहे. म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये फक्त 4 टक्क्यांचाच फरक आहे. 

फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेत मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून योगी आदित्यनाथ यांना 25 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत योगी आदित्यनाथ यांना 26 टक्के पसंती होती. म्हणजेच मागील सहा महिन्यात यामध्ये 1 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, असं असलं तरीही भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी आगामी काळात योगी हे आपल्या प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकतात.

नितीन गडकरी पंतप्रधान होणार? 

आजवर महाराष्ट्राला कधी पंतप्रधान पद मिळालेलं नाही. हा इतिहास भाजपचे नितीन गडकरी पुसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून देशातील जनतेने मोठ्या प्रमाणात नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी हे 2014 नंतर केंद्रीय राजकारणात अधिक सक्रीय झाले. एकीकडे मोदींची हिंदत्वावादी प्रतिमा समोर असतानाही गडकरींनी मात्र, विकासाचं राजकारण करत आपल्या कारकीर्दीला आकार देण्याच प्रयत्न केला. 

दळणवळण, रस्ते बांधणी यासारखं मंत्रालय मिळाल्याने गडकरींनी त्यांचा सगळा फोकस हा पायाभूत सुविधा यावरच दिला. मोकळेढाकळे आणि स्पष्टवक्ते असलेल्या गडकरींनी मागील काळात कमीत कमी राजकीय टीका-टिप्पणी करत केवळ विकासकामंच जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आता पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे देशातील जनता पाहत आहेत. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची पसंती ही नितीन गडकरी यांना मिळाली आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेत मोदींचे उत्तराधिकारी आणि पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीन गडकरींना 16 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ऑगस्ट 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत त्यांना 15 टक्के पसंती होती. म्हणजेच मागील सहा महिन्यात त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT