NCP Crisis : अजित पवारांना मिळणार घड्याळ चिन्ह? शरद पवार तसे का बोलले?
राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार? केंद्रीय निवडणूक आयोग कसा घेणार निर्णय? शरद पवारांच्या भूमिकेचा अर्थ काय?
ADVERTISEMENT

Sharad Pawar and Ajit Pawar marathi news : पवार काका-पुतण्यामध्ये विभागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर कब्जा मिळवण्याची ‘खरी’ लढाई आता सुरू झालीये. राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह कोणाचे असेल? याबाबत अजित पवार गटाने यापूर्वीच निवडणूक आयोगाला उत्तर पाठवले आहे. तर आता शरद पवार गटाला 13 सप्टेंबरपूर्वी उत्तर द्यायचे आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या एका विधानाने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. (Will Ajit Pawar get NCP name and party symbol?)
पक्षाचे अध्यक्ष बदलले असून आता खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमचा गट आहे, असा दावा अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष राहतील, असे या गटाने आयोगाला सांगितले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे घड्याळ निवडणूक चिन्ह अजित पवार गटाकडे जाऊ शकते, असे विधान शरद पवारांनी केलेय. ते अलिकडेच म्हणालेले की, ‘निवडणूक आयोगाच्या नोटिशीला मी उत्तर दिले आहे. शिवसेना प्रकरणात दिलेला निर्णय बघता आमचेही निवडणूक चिन्ह धोक्यात आल्याचे दिसते. पण मला त्याची पर्वा नाही. कारण मी बैलगाडी, गाय, वासरू या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवली आणि जिंकली आहे.’
त्यामुळे आता ‘खरी’ राष्ट्रवादी काँग्रेस कोणती? यावर निवडणूक आयोग निर्णय घेईल. दोन्ही गटांकडून दिल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ कोणाला मिळणार याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.