NCP: अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची शरद पवारांनी दिली उत्तरं!
NCP President: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णय घेतल्यानंतर आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्याबाबत शरद पवारांनीच उत्तरं दिली आहेत.
ADVERTISEMENT
NCP Latest News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्ष पदाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार (Sharad Pawar) कधी आणि नेमका काय घेणार हा प्रश्न आता अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. ज्याबाबत स्वत: शरद पवार यांनीच उत्तर दिलं आहे. या सदंर्भात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत आज जी (3 मे) बैठक झाली त्यात असं ठरल्याचं समजतंय की, 5 आणि 6 मे पर्यंत हा निर्णय होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी बैठकीत स्पष्ट केलं आहे की, त्यांनी जी समिती घोषित केली होती. त्या समितीची 5 आणि 6 मे रोजी एक बैठक होईल आणि या बैठकीत जो काही निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल. असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. (sharad pawar has given an answer about what decision he will take regarding the post of ncp president)
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली त्यावेळी त्यांनी नव्या अध्यक्षाच्या नेमणुकीसाठी एक समिती तयार केली. या समितीत तेच नेते होते जे शरद पवारांच्या कालच्या निर्णयाला विरोध करत होते. काल एका नेत्याने म्हटलं देखील होतं की, आम्हीच त्या समितीत आहोत.. आम्हीच तुम्हाला सांगतोय की, तुम्ही या पदावर कायम राहा.
हे ही वाचा>> शरद पवारांनी दिले वेगळेच संकेत; ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?
दुसरीकडे जितेंद्र आव्हाड देखील असं म्हणाले की, तुम्ही कुठल्या अधिकाराने हा निर्णय घेतला. तुम्ही आमच्यासोबत सल्ला मसलत का केली नाही?
हे वाचलं का?
म्हणूनच आता ते शरद पवार सुद्धा म्हणत आहेत की, 5 आणि 6 तारखेला या समितीची जेव्हा बैठक होईल त्या बैठकीत जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल आणि तोच पुढचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष असणार आहे.
शरद पवार यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर असंही बोलून दाखवलं आहे की, पक्षाचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना अशा निर्णयासंदर्भात कोणतीही कल्पना न देता मी थेट जो निर्णय जाहीर केला तर मी तसं करायला नको होतं. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी पूर्वकल्पना द्यायला हवी होती. हे सुद्धा आता जाणवत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Sharad Pawar: राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!
पण यावेळी शरद पवार असंही म्हणाले की, जरी मी पक्ष कार्यकर्त्यांना याची कल्पना दिली असती तरी त्यांच्या काय प्रतिक्रिया असता हे मला कुठे तरी माहिती होतं आणि म्हणून मी थेट माझा जो निर्णय आहे तो जाहीर केलेला आहे.
ADVERTISEMENT
अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची शरद पवारांनी दिली उत्तरं
- – शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही बाब मान्य केली की अध्यक्षपदावरून पायउतार होण्याबद्दलचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.
- – पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना असंही म्हणाले की, या निर्णयाबद्दल जर मी प्रत्येकाला विचारलं असतं, तर साहजिक आहे की त्यांनी याला विरोध केला असता आणि त्यामुळेच याची थेट घोषणा करण्याचा निर्णय घेतला.
- – शरद पवारांनी या बैठकीत सांगितलं की, आता समितीची बैठक बोलवा. 5 किंवा 6 मे रोजी ही बैठक बोलवून समितीने यासंदर्भात निर्णय घ्यावा. जो निर्णय समितीकडून घेतला जाईल, तो मी स्वीकारेन.
- – 1 मे 1960 रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. त्यामुळे 1 मे या तारखेशी माझा विशेष ऋणानुबंध आहे. त्यामुळेच मी युवक काँग्रेसच्या मागच्या बैठकीत भाकरी फिरवण्याची इच्छा बोलून दाखवली, असंही पवार वरिष्ठ नेत्यांशी बोलताना म्हणाल्याचं सुत्रांनी सांगितलं.
- – तरुणांच्या मतांचा गांभीर्याने विचार करणारा मी नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचाही मी आदर करतो. ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचे आहे, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षाच्या वरिष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांनी भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. त्याचबरोबर निर्णयाचे सर्व अधिकार समितीला दिले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT