‘मी भावाला बरोबर ओळखते, तो हट्ट..’,शरद पवारांच्या बहिणीचा मोठा दावा
Saroj Patil Reaction on sharad pawar political Retirement : शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बहिण स्वर्गीय एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी मोठा दावा केला आहे. सरोज पाटील नेमकं काय म्हणाल्या आहेत, ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Saroj Patil Reaction on sharad pawar political Retirement : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी मंगळवारी ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केली होती. शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. शरद पवार यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. आता शरद पवार यांच्या राजीनाम्यावर बहिण स्वर्गीय एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील (Saroj Patil) यांनी मोठा दावा केला आहे. सरोज पाटील नेमकं काय म्हणाल्या आहेत, ते जाणून घेऊयात.(sharad pawar step down as ncp chief sister saroj patil reaction)
ADVERTISEMENT
मी माझ्या भावाला बरोबर ओळखते, माझा भाऊ गप्प बसणाऱ्यातला नाही आहे. त्याचे समाजकारण, राजकारण चालूच राहणार आहे अशी प्रतिक्रीया सरोज पाटील (Saroj Patil) (माई) यांनी लोकशाही न्यूजला दिली. त्या पुढे म्हणाल्या,फक्त त्याच इतकंचं म्हणण आहे, हा पक्ष घट्ट वटवृक्षाप्रमाणे उभा राहिला पाहिजे. माझे आता वय झालेय, इथून पुढे तरूणांना संधी दिली पाहिजे. त्यांना सक्षम केले पाहिजे, नाहीतर पक्ष कोसळलायला वेळ लागणार नाही,असे सरोज पाटील म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा >> अवघ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची शरद पवारांनी दिली उत्तरं!
NCP च्या कार्यकर्त्यांना आवाहन
पदाचा राजीनामा दिलाय म्हणजे समाजकारण, राजकारण सोडलंय असे नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. दुख व्यक्त करू करून राजीनामे देऊ नका. उलट आपली वज्रमुठ घटट् असली पाहिजे, तरच तुम्ही भाजपला टक्कर देऊ शकतो, असे आवाहन देखील सरोज पाटील (Saroj Patil) यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.
हे वाचलं का?
राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे सोपवणार?
माझा भाऊ आणि त्याचा राजकारणातील ब्रँड मला माहिती आहे. तो जर पायउतार झाला तर जयंत पाटील किंवा सुप्रिया सुळे (Supriya Sule) या दोघांची निवड करू शकतो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यात आहे.तर सुप्रिया यांना राष्ट्रीय नेत्याच्या दर्जाच्या नेत्या बनवण्यात आले आहे. दोघे पदासाठी योग्य आहेत. मला खात्री आहे का तो या दोघांपैकी एकाला निवडेल,असे सरोज पाटील म्हणाल्या होत्या.याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले होते.
हे ही वाचा >> राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार राहणार की जाणार?, ‘या’ तारखेला होणार निर्णय
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT