Jalana Maratha Protest : शरद पवारांच्या ताफ्याला जालन्यात विरोध, नेमकं काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरावली सरावटीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी अचानक पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात 350 हुन अधिक नागरीक आणि काही पोलीस गंभीर जखमी झाले होते. या लाठी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागात या घटनेचा निषेध करण्यात आला. या सर्व घडामोडींवर आज शरद पवार यांनी मराठा आंदोलकांची जालन्यात जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर परतत असताना शरद पवारांना देखील आंदोलकांचा विरोधाला सामोरे जावे लागले होते. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव शरद पवारांच्या ताफ्याचा मार्ग बदलण्यात आला होता. टीव्ही 9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे. (sharad pawar visit jalana meet maratha protester due to security reason sharad pawar’s convoy change root)

ADVERTISEMENT

खरं तर जालन्यातील मराठा समाजावरील पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर निषेध म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागात आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज पहाटे जालन्यात होते. या भेटीनंतर ज्या मार्गावर त्याचा परतीचा प्रवास होता, त्या मार्गावर देखील मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शरद पवारांच्या ताफ्याचा मार्ग बदलण्यात आला होता.

हे ही वाचा : Jalna Maratha Andolan Update: ‘लाठीहल्ला करुन…’ संभाजीराजे संतापले, डागली तोफ

शरद पवार काय म्हणाले?

‘मी जखमी लोकांना भेटलो आणि आंदोलकांना भेटलो.. ते सतत एक गोष्ट सांगत होते की, आमचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण वरून आदेश आला. फोन आला कोणाचा तरी आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला.. आता हा कोणाचा फोन आला ते आंदोलकांना माहीत नव्हतं. पण बाहेर जे लोक घोषणा देत होते ते राज्याच्या गृहमंत्र्यांसंबंधी घोषणा देत होते. पण त्यासंबंधीची खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाही.,असे शरद पवार यांनी सांगितले.

हे वाचलं का?

‘आंदोलकांकडे मोबाइलमध्ये जे चित्रिकरण आहे ते पाहा, त्यात स्वच्छ असं दिसतंय की, लोक बसले आहेत कोण तरी अधिकारी चर्चा करतंय. पाठीमागून ज्यांच्या डोक्यावर हेल्मेट आहे असे पोलीस मोठ्या संख्येने येतात आणि ते येतात आणि थांबतात आणि थोड्या वेळाने ते सरळ उठून लाठीहल्ला करायला सुरुवात करतात. ते लाठीहल्ला करताना सैरावैरा धावतात. हा त्यांच्यावरचा हल्ला पोलिसांवर हल्ला झालेला दिसत नाही. पोलिसांकडून हल्ला झाला असं दिसतं.”मी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांची नोकरी आहे.. त्यांना कोणी आदेश दिला असेल त्यासंबंधीची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी व्हायची असेल तर उच्चस्तरीय होऊन चालणार नाही. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी करत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा : Kolhapur: हिंदू-मुस्लिम प्रेमी युगलाची आत्महत्या, Instagram वर ‘ते’ स्टेटस ठेवलं अन्..

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT