Eknath Shinde: ‘गुगली टाकणाऱ्यांना पण अजित पवारांची…’, CM शिंदेंकडून मोठा गौप्यस्फोट?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shasan aplya dari sharad pawar is now slowly accepting ajit pawar decision to go with bjp cm eknath shinde eyebrow raising statement
shasan aplya dari sharad pawar is now slowly accepting ajit pawar decision to go with bjp cm eknath shinde eyebrow raising statement
social share
google news

CM Eknath Shinde Shasan Aplya Dari: परभणी: ‘मला वाटतं अजितदादांची भूमिका हळूहळू गुगली टाकणाऱ्यांना पटतेय, पटत चालली आहे. म्हणूनच त्यातून अशा प्रकारचे भाष्य होतायेत.’ असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी परभणीतील शासन आपल्या दारी या जाहीर कार्यक्रमात केलं आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (shasan aplya dari sharad pawar is now slowly accepting ajit pawar decision to go with bjp cm eknath shinde eyebrow raising statement maharashtra politics latest news)

ADVERTISEMENT

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना सोबत घेऊन बंड करून थेट भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतरही पक्षात फूट पडलेली नाही. असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील सातत्याने म्हणत आहेत की, अजित पवार हेच आमचेच नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात बराच संभ्रम निर्माण झाला आहे.

हे ही वाचा>> Uddhav Thackeray: ‘थापाड्या बोलणार होता पण..’; फडणवीसांवर ठाकरेंचा पुन्हा वार..

शरद पवार हे आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या राजकीय गुगली टाकत असल्याचं आपण पाहिलं आहे. आता त्यांनी अजित पवारांबाबत घेतलेली भूमिका ही देखील एक प्रकारची गुगलीच असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. असं असताना मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र असं म्हटलं आहे की, शरद पवार यांना अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही पटू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

पाहा परभणीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले…

‘अगोदर म्हणत होते सरकार पडणार, पण सरकार पडता-पडता अजितदादाच आमच्यासोबत आले. आणखी सरकार मजबूत झालं. आता मुख्यमंत्री बदलणार म्हणतात. अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी.. सर्वसामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री चालत नाही का तुम्हाला? म्हणून मी सांगतो की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण जे असे कार्यक्रम घेतोय त्यामुळे जळफळाट सुरू आहे. पायाखालची वाळू सरकली आहे.’

‘काल बारामतीत अजितदादांचं जंगी स्वागत झालं. जनतेनेवर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्यांच्यावर.. पण काही लोकं दररोज वेगवेगळ्या गुगल्या टाकत आहेत. त्यामध्ये राजकारणात गोंधळात भर टाकण्याचा प्रयत्न करतायेत. त्यांना ते करू द्या… चांगलं आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Devendra Fadnavis : ‘..आम्ही तिघंही स्वस्थ बसणार नाही’; फडणवीसांनी कोणाला ठणकावलं?

‘हळूहळू मला वाटतं अजितदादांनी जी भूमिका घेतली आहे देशाचं नेतृत्व मोदी साहेब करतायेत ते देश पुढे नेत आहेत. देशाचा विकास होतोय.. देशाची अर्थव्यवस्था 10 व्यावरुन पाचव्या वर आली. देश महासत्तेकडे वाटचाल करतोय. राज्याचा विकास होतोय.. राज्य पुढं जातंय.. मला वाटतं अजितदादांची भूमिका हळूहळू गुगली टाकणाऱ्यांना पटतेय, पटत चालली आहे. म्हणूनच त्यातून अशा प्रकारचे भाष्य होतायेत.’ असा गौप्यस्फोटच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.

ADVERTISEMENT

आता त्यांच्या याच वक्तव्याबाबत शरद पवार किंवा त्यांच्या गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT