MLA Disqualification : खरी शिवसेना शिंदे गटाचीच, ठाकरे गटाकडे आता एकच मार्ग

मुंबई तक

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निर्णय दिल्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडे पर्याय काय राहिला आहे त्याचीही आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. कारण आता दोन्हीही गटाचे आमदार अपात्र झाले नसले तरी ठाकरे गट पुढचा निर्णय काय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

Shiv Sena chief Uddhav Thackeray now has only one option due to the verdict of Assembly Speaker Rahul Narvekar
Shiv Sena chief Uddhav Thackeray now has only one option due to the verdict of Assembly Speaker Rahul Narvekar
social share
google news

MLA Disqualification : विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र करण्यात आले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कायम राहतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. संविधान, कायदा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले.

 ठाकरे गटात फूट

निवडणूक आयोगाकडून यापूर्वीच शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र आता राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटामध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे ठाकरे गटात फूट पडण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण, विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे काही आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाण्याचीही शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता या निकालामुळे ठाकरे गटाला पक्ष म्हणून सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे.

हे ही वाचा >> MLA Disqualification: CM शिंदेंविरोधात निकाल गेला तर.. असं बदलेल महाराष्ट्राचं राजकारण

हाच एकमेव मार्ग

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर पदली आलेल्या निराशेमुळे आता उद्धव ठाकरेंसमोर कोणता पर्याय उरला आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे. खरे तर उद्धव ठाकरे गटाकडे सर्वोच्च न्यायालयात जाणे हाच एकमेव मार्ग उरला असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी हा निकाल लागण्याआधीच अध्यक्षांचा निर्णय आपल्या बाजूने लागला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देऊ असा इशारा दिला होता. त्यामुळे आता सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे याचिका दाखल करतील असंही मानलं जात आहे. तरीही सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देईल आणि त्याचा ठाकरेंना काय फायदा होईल हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

शिवसेनेची घटना महत्वाची

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी शिवसेनेची घटना वाचली आहे. त्यामुळे माझ्यासमोर खरी शिवसेना कोणती हा खरा मुद्दा होता. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, आमदारांच्या अपात्रतेबाबत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले होते. या निर्णयावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या 1999 मध्ये झालेल्या घटनेचा संदर्भ देत म्हणाले की, माझं कार्यक्षेत्र हे मर्यादित आहे. त्यामुळे मी निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp