“नकली वाघांचा एक मिंधे प्रयोग”, शिवसेनेने (UBT) वर्धापन दिनी शिंदेंना काय दिला इशारा?
महाराष्ट्रात 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर एकाच दिवशी दोन राजकीय पक्षाचा वर्धापन दिनी साजरा होण्यास सुरूवात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना.
ADVERTISEMENT

shiv sena foundation day : महाराष्ट्रात 2022 मध्ये झालेल्या बंडानंतर एकाच दिवशी दोन राजकीय पक्षाचा वर्धापन दिनी साजरा होण्यास सुरूवात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना. याच निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेवर भाष्य करताना टोले लगावले आहेत. ‘डरकाळीची 57 वर्षे!’ असा अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाला असून, त्यात एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांवर ठाकरेंनी प्रहार केला आहे. (Shiv Sena Foundation Day : Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)
“शिवसेना 57 वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील 40 बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले व ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले”, असं भाष्य अग्रलेखातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिंदे आणि 40 आमदारांबद्दल केले आहे.
ठाकरे विरुद्ध शिंदे : अग्रलेखात काय?
– “पुराण काळात प्रतिसृष्टी निर्माण झाली. प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे गमतीजमती सुरूच असतात; पण सोन्यापुढे लोखंड कसे टिकणार? चोरलेल्या आमदार, खासदारांचा आकडा म्हणजे वैचारिक बैठक नव्हे. शिवसेनेच्या जडणघडणीत, पर्यायाने महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचे योगदान काय? शिवसेना स्थापन झाली तेव्हा तुम्ही गोधड्या भिजवत होता. आता म्हणे ‘आम्हीच शिवसेनेचे निर्माते!’ हा असा आव आणणाऱ्यांच्या कमरेवरची वस्त्रं दिल्ली दरबारी उभे राहताच भीतीने भिजतात.”
हेही वाचा >> मोदी, शाह, फडणवीस; उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात फुंकले रणशिंग, शिवसैनिकांना काय दिला मेसेज?
– “यांचे नेते मोदी आणि शाह, जे महाराष्ट्राच्या अस्मितेचा पायाच उखडून टाकायला निघाले आहेत. तर हे प्रतिवालेही त्यांच्या प्रतिशिवसेनेचा म्हणे वर्धापन दिन साजरा करीत आहेत. अशा ‘प्रति’ मंडळांच्या मनगटात ना ताकद
ना छातीत स्वाभिमानाचा हुंकार आणि जिद्द. सर्व खेळ पैशांचा. दिल्लीच्या चरणी थैल्या वाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणारे शिवसेनेचे नाव घेतात तेव्हा शिवसेनेसाठी रक्त सांडणारे असंख्य आत्मे चिडून तडफडत असतील.”










