‘शिवसेनेतून राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो..’, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाणामध्ये बोलताना खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. तसंच भुवया उंचावणारं विधान देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
ADVERTISEMENT
Political News in Maharashtra: बुलढाणा: ‘जर गद्दारी करायची असतीच तर राज ठाकरे, नारायण राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो.. किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो असतो.’ असं म्हणत शिवसेना (Shiv Sena) नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना (UBT) आणि खासदार संजय राऊतांवर (sanjay Raut)तुफान टीका केली. ते बुलढाण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे. (shiv sena minister gulabrao patil criticism sanjay raut narayan rane raj thackeray political news in maharashtra)
‘राऊतांनी उद्धव ठाकरेंना चुकीचं ब्रह्मज्ञान दिलं’
‘राऊतसारख्या महामंडलेश्वर 1008 ने शिवसेनेचे वाट लावली. उद्धव ठाकरे यांना चुकीचं ब्रह्मज्ञान दिलं. तर आम्ही संघटनेत खारीचा वाटा दिल्यानेच लोकांनी आम्हाला चार, पाच वेळा आमदार केलं. आता तर सुप्रीम कोर्टाने देखील आमच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. मग तुम्ही आम्हाला गद्दार म्हणणारे कोण? असा सवाल करताना, आम्ही जनतेतून निवडून येतोय तर हा नेत्यांच्या तुकड्यावर. याची नगरसेवकाएवढी देखील लायकी नाही.’, अशी घणाघातील टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे.
हे ही वाचा >> बंड यशस्वी झालं नसतं तर शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते: दीपक केसरकर
यावेळी बोलाताना पाटील असंही म्हणाले की, ‘हिंमत असेल तर ये आणि उभं राहा म्हणावं पंढरपुरात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला…’ असं आव्हानही गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलं आहे. गुलाबराव पाटील यांनी गद्दार, 50 खोके, एकदम ओकेवरून आपला प्रचंड संतापही यावेळी व्यक्त केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो..’
‘गेली वर्षभर आम्ही गद्दार, खोके ऐकत आहोत. पण ठीक आहे. आता 35 वर्षे आम्ही तिथेच घासली आहे. शिवसेना वाढविण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून कामं केली. पण आता आम्ही गद्दार.. जर गद्दारी करायची असतीच तर राज ठाकरे, नारायण राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो.. किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो असतो. पण तसं नाही केलं आम्ही.. शिवसेना सोडली नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.’ असंही पाटील म्हणाले..
हे ही वाचा >> Suraj Chavan : आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांच्या घरासह 16 ठिकाणी ED चे छापे
‘तर ज्यावेळेस विचारांचा विषय आला ज्यावेळेस बाळासाहेबांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जाते याचा विषय आला.. त्यानंतरच तो निर्णय घेतला. मात्र, राऊतसारख्या महामंडलेश्वर 1008 ने शिवसेनेचे वाट लावली. उद्धव ठाकरे यांना चुकीचं ब्रह्मज्ञान दिलं. तर आम्ही संघटनेत खारीचा वाटा दिल्यानेच लोकांनी आम्हाला चार, पाच वेळा आमदार केलं. आता तर सुप्रीम कोर्टाने देखील आमच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. मग तुम्ही आम्हाला गद्दार म्हणणारे तुम्ही कोण?’ असा सवाल पाटील यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
आता गुलाबराव पाटील यांच्या या टीकेनंतर संजय राऊत किंवा शिवसेना नेते नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT