Uddhav Thackeray: ‘मी तेव्हा चूक केली… बापाची जहागिरी वाटते..’, कल्याणमध्ये ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर टीकेची झोड

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shiv sena ubt that time i made a mistake uddhav thackerays stormy criticism of eknath shinde and shrikant shinde in kalyan lok sabha constituency
shiv sena ubt that time i made a mistake uddhav thackerays stormy criticism of eknath shinde and shrikant shinde in kalyan lok sabha constituency
social share
google news

Uddhav Thackeray Kalyan Lok Sabha Constituency: मुंबई: निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे.. पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे. आता त्यावेळेला ती चूक झाली. कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो. पण यांना धुणीभांडीच करायची होती.. म्हणून हे सुरतेला गेले, गुवाहटीला गेले.. अशी घणाघाती टीका करत शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंना निवडणुकीत पराभूत करण्याच आवाहन केलं. (shiv sena ubt that time i made a mistake uddhav thackerays stormy criticism of eknath shinde and shrikant shinde in kalyan lok sabha constituency)

उद्धव ठाकरे हे आज (13 जानेवारी) कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून इथे त्यांनी वेगवेगळ्या विभागात जाऊन छोटेखानी सभा देखील घेतल्या. यावेळी कल्याण मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंविरोधात प्रचाराचा नारळच फोडला.

हे ही वाचा>> ‘लोकसभेनंतर राज्यात राजकीय भूकंप’, पंतप्रधानांसमोरच CM शिंदेंचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंची कल्याणत येऊन शिंदेवर टीका..

कल्याण मतदारसंघ हा सुरुवातीपासून आपल्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांनी-ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली त्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे. पंतप्रधान काल खूप काही बोललेत.. घराणेशाहीवरही बोलले.. म्हणून योगायोग असेल.. काल ते येऊन गेले. आज मी अशा मतदारसंघात आलोय की, जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची आहे.

मी पंतप्रधांनाना सांगतोय घराण्यावर बोलू नका.. तुम्ही जर आमच्या घराण्यावर बोललात तर आम्ही सुद्धा तुमच्या घराण्यावर बोलू.

निदान.. जो घरंदाज आहे त्यांने घराणेशाहीवर बोलायचं.. जो घरंदाजच नाहीए. तो काय घराणेशाहीवर बोलणार? हे त्यांना माहिती नाही की, घराणं म्हणजे काय असतं.. घराण्याची परंपरा काय असते.. ही त्यांना कल्पना नाही म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली.. होय मी सरळ बोलतो.. ठाकरेंची घराणेशाही नकोशी वाटली आणि गद्दारांची घराणेशाही आपलीशी वाटली.

अशी ही सगळी गद्दारांची घराणेशाही आहे ती गाडून टाकायची आहे. ही घराणेशाही किंवा गद्दारी केवळ लोकसभेत नाही तर विधानसभेत सुद्धा गाडावी लागेल. महापालिका कधी होतील? घाबरतायेत..

आज मला बरं वाटलं.. कारण ज्यांना असं वाटत होतं की, कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे अपने बाप की जायदाद है… असं त्यांना वाटलं होतं. कारण त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे.. पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे. यावेळेला मी सुद्धा ती सुधारणार आहे.

देशभर निवडणूक तर होणार आहे.. पण कल्याण मतदारसंघावर विशेष जबाबदारी आहे. नुसता गाडायचा नाही… तर पाताळात गाडायचा. असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की, या महाराष्ट्रात गद्दार आहेत.. ते पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नयेत. अशा पद्धतीने त्यांना गाडलं पाहिजे.

आतापासूनच कामाला लागा.. आपला जो निष्ठावंत उमेदवार मी तुम्हाला देईन.. होय आता मी निष्ठावंत देणार आहे. गद्दार देणार नाही.. आता त्यावेळेला ती चूक झाली. कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो. पण यांना धुणीभांडीच करायची होती.. म्हणून हे सुरतेला गेले, गुवाहटीला गेले.. अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT