“अशा घुशी खूप पाहिल्या, आता शेपटीला धरायचं अन्…” : गुलाबरावांच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई तक

खेड, मालेगावनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा पार पडली.

ADVERTISEMENT

Shivsena UBT cheif Uddhav Thackeray Answer to Shivsena Leader Gulabrao Patil in Pachora rally
Shivsena UBT cheif Uddhav Thackeray Answer to Shivsena Leader Gulabrao Patil in Pachora rally
social share
google news

पाचोरा : काही जणांना वाटलं होतं, तेच म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार म्हणे. अशा घुशी खूप पाहिल्या, पण अशा घुशींच्या शेपटीला धरुन त्यांना निवडणुकीत आपटायचं आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दगड घेऊन सभेत घुसणार या आव्हानावर प्रत्युत्तर दिलं. (Shivsena UBT cheif Uddhav Thackeray Answer to Shivsena Leader Gulabrao Patil in Pachora rally)

उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोरामधील जाहीर सभेत बोलत होते. खेड, मालेगावनंतर ठाकरे यांची शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा पार पडली.  “आम्ही दगडे मारून सभा बंद करणारे लोकं आहोत, त्यामुळे आम्हाला चॅलेंज करू नये”, असं थेट आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिले होते. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्तुत्तर दिले.

पाकिस्तानही सांगेल, शिवसेना कोणाची… :

पाकिस्तानला विचारल शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगले. पण आमच्याकडे मोतिबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला सांगूनही कळत नाही. त्यात त्यांचा धृतराष्ट्र झाला ही त्यांची चुकी नाही. ही गर्दी बघितल्यावर कळतं शिवसेना कोणाची. पण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखले नाही.

‘नाही रे बाबा मी त्यांचा बाप नाही :

मी आल्यानंतर मगाशी कोण तरी म्हणालं, आला रे आला गद्दारांचा बाप आला. अजिबात नाही. असली घाणेरडी आणि गद्दार औलाद आपली असूच शकत नाही. पाठीवरती सोडच पण आईच्या कुशीवरती वार करणारी गद्दारांची औलाद ही आमची असू शकत नाही, असं म्हणतं ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर सणसणीत टीका केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp