मुंबई वज्रमूठ सभा : “मोदीजी, तुमच्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बूच घाला, अन्यथा…”, ठाकरे कडाडले
शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत भाषण.
ADVERTISEMENT

मुंबई : मोदीजी, तुमची भोकं पडलेली टिनपाटं मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना जे रोज बोलतात, त्यावर का तुम्ही गप्प आहात? या भोकं पडलेल्या टिनपाटांना बूच घाला, म्हणजे सगळं ठीक होईल, असं म्हणतं शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपमधील प्रवक्त्यांवर टीका केली. ते महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) सर्व नेते उपस्थित होते. (ShivSena (UBT) Chief Uddhav Thackeray Speak in Vajramuth Rally in Mumbai)
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटकची निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने मला 91 वेळा शिव्या दिल्या. तुम्ही शिव्या मोजणारी सभ्य माणसं आहाता. मला मोदी साहेबांना सांगायचं आहे, मी शिव्या देण्याचं समर्थन करत नाही. पण तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस मला शिव्या देत आहे, मग त्याचवेळी तुमची भोकं पडलेली टिनपाटं मला, आदित्यला, माझ्या कुटुंबियांना जे रोज बोलतात, त्यावर का तुम्ही गप्प आहात?
अजूनही ते ज्या भाषेत बोलतात, त्या भाषेत माझा शिवसैनिक अजूनही बोललेला नाही. संजय राऊतही त्या भाषेत बोलले नाहीत. आम्ही तुमचा मान ठेवतो, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण तुम्ही त्या भोकं पडलेल्या टिनपाटांना बुच घाला, म्हणजे सगळं ठीक होईल. तुमची लोकं वाट्टेल ते बोलणार, मग त्यावर आमची लोकंही बोलणारचं, असा इशारा यावेळी ठाकरेंनी दिला.
बारसूला जाणार आणि बोलणार, तुम्ही कोण मला आडवणारे?
यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी बारसूबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात बारसूचा विषय भडकलेला आहे. येत्या 6 तारखेला बारसूला जाऊन लोकांना भेटून बोलणार. कसं काय तुम्ही मला आडवू शकता? तो पाकव्याक्त काश्मीर नाही, बांगलादेश नाही, माझ्या महाराष्ट्रातील रत्नागिरीतील तो भाग आहे. 6 तारखेला आधी मी बारसूला जाणार आणि नंतर महाडच्या सभेला जाणार, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.










