सोलापूर विधानपरिषद : राजेंद्र राऊत खिंडीत अडकले? आता ते नेते काट्याने काटा काढणार?

मुंबई तक

solapur Vidhan parshad election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासमोर अनेक राजकीय आव्हाने उभी राहत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील समीकरणे, नाराजी आणि जुने वाद निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

ADVERTISEMENT

solapur Vidhan parshad election 2026
solapur Vidhan parshad election 2026
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर विधानपरिषद : राजेंद्र राऊत खिंडीत अडकले?

point

आता ते नेते काट्याने काटा काढणार?

Solapur Vidhan parshad election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना वरकरणी बहुमताची मजबूत साथ असल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या वाटेत अनेक राजकीय अडथळे उभे राहत असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि महायुतीकडे संख्याबळ असल्याने निवडणूक सोपी मानली जात असली तरी मतदानाची वेळ जवळ येत असताना विविध मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ लागले आहेत. स्वतः राजेंद्र राऊत यांनी मोठ्या मताधिक्याचा दावा केला असला, तरी जिल्ह्यातील काही जुने राजकीय वाद आणि स्थानिक समीकरणे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा : ‘त्या’ भव्य-दिव्य सोहळ्याला एकनाथ शिंदेंना बोलवायला विसरले की डावललं? , राजकारणाच्या नव्या डावाने कोणाची विकेट?

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं प्रकरण 

राऊत यांच्या अडचणींमध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित प्रकरण. बँकेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते अडचणीत आल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली असून त्यातील अनेक नेते आता भाजप किंवा महायुतीसोबत आहेत. त्यामुळे त्या काळातील घडामोडी आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी निवडणुकीत परिणाम करू शकते का, याकडे लक्ष लागले आहे. राऊत यांनी मात्र आपण शेतकऱ्यांची बँक वाचवण्यासाठी भूमिका घेतल्याचे सांगत या आरोपांचे खंडन केले आहे.

हेही वाचा : सेंटर पॉइंटः राष्ट्रवादी कॉंग्रेस नेमकं चालवतंय कोण? ‘ही’ Inside स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

हे वाचलं का?