‘गद्दारी झाली तेव्हा ठाकरेंना पहिला फोन सोनिया गांधींचा’, म्हणालेल्या तुम्ही…
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा उद्धव ठाकरे यांना पहिला फोन सोनिया गांधी यांनी केला होता. असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

Sonia Gandhi first phone call to Uddhav Thackeray: मुंबई: ‘ज्या वेळेला या महाराष्ट्रात गद्दारी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना केला आणि सांगितलं.. जे व्हायचं ते होऊ द्या. काँग्रेस आपल्यासोबत आहे आणि नेहमी आपल्यासोबत राहील.’ असं विधान काँग्रेसचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित वज्रमूठ सभेत बोलताना केलं आहे. यावेळी भाई जगताप यांनी म्हटलं की, जोवर भाजपचं सरकार घालवणार नाही तोवर महाआघाडी ही कायम राहील. (sonia gandhi made the first phone call to uddhav thackeray when eknath shinde rebelled said bhai jagtap)
व्रजमूठ सभेत भाई जगताप नेमकं काय म्हणाले?
‘कोणी भविष्य सांगितलं असतं की, शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आहे तर कोणाचा विश्वास बसला नसता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की, ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गिळंकृत करायचं पाप हे जे असैंविधानिक जे सरकार आहे ते करत आहे. अशा वेळेला आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णय घेतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घेतला.. काळाची गरज आहे.. आम्हाला एकत्र येण्याची गरजेचं आहे. राक्षसाच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. म्हणून ही लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी ही अशी तुटकीफुटकी नाही.’
हे ही वाचा>> ‘गौतमीचा कार्यक्रम ठेऊन अजित पवारांना….’,अब्दुल सत्तार यांच्या कानपिचक्या
‘एक गोष्ट या ठिकाणी मनापासून सांगतो. आदित्य यांनी इथे एक गोष्ट भावनिक होऊन सांगितली.. जी खरी आहे. की, ज्या वेळेला या महाराष्ट्रात गद्दारी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला फोन सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना केला आणि सांगितलं.. जे व्हायचं ते होऊ द्या. काँग्रेस आपल्यासोबत आहे आणि नेहमी आपल्यासोबत राहील. हा विश्वास सोनिया गांधींनी पहिल्या दिवशी त्याठिकाणी दिला.’










